महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे जाहीर सभेत माहीमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्यात आली असल्याचे सांगत त्याचे व्हिडिओही दाखवले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेथून मजार हटवण्यात आली. या कारवाईला काही दिवस नाही होत तोच पुन्हा एकदा या ठिकाणी मुसलमानांची ये-जा सुरु झाल्याचे एका वृत्तवाहिनीने दाखवले आहे. त्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी मुसलमानांनी अनधिकृत बांधकाम बांधू नये, यासाठी यंत्रणांना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे, असे दिसते.
माहीमच्या समुद्र किनाऱ्यालगत एक छोटा भूभाग आहे. त्या ठिकाणी मुसलमान अनेक वर्षांपासून ये-जा करत होते, मात्र मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी चक्क मजार बांधण्यात आली होती, तिकडे मुसलमान नियमित जाऊ लागले होते. त्यावर राज ठाकरे यांनी या ठिकाणी दुसरी हाजी अली उभारण्याचे कटकारस्थान सुरु असल्याचे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या त्या भाषणानंतर यंत्रणांनी तात्काळ त्याची दखल घेत ती मजार हटवली. मात्र या कारवाईनंतर काही दिवस उलटत नाही तोच त्या ठिकाणी मुसलमानांची पुन्हा ये-जा सुरु झाल्याचे दिसत आहे. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने मुसलमान अनधिकृत बांधकाम बांधणार नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि सतर्कता बाळगावी, अशी मागणी मनसेचे नेते करत आहेत.
(हेही वाचा उद्धव ठाकरे म्हणतात, फडणवीस फडतूस; फडणवीसांनी दिले जोरदार प्रत्युत्तर)
Join Our WhatsApp Community