माहीमचे शोभा हॉटेल सील, ११ कामगार कोरोना बाधित

धारावी, माहीम आणि दादर या जी उत्तर विभागात शनिवारी २७१ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीत ७४ तर दादरमध्ये ९४ रुग्ण आढळून आले.

दादर- महिममध्ये मागील तीन दिवसांपासून रुग्णांचा शतकी आकडा पार झाल्याने महापालिकेने येथील यंत्रणा अधिक कडक करत उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी माहीममध्ये तब्बल १०५ रुग्ण आढळून आले असून माहीम येथील शोभा हॉटेलमधील ११ कर्मचारी बाधित निघाले आहेत. त्यामुळे हे हॉटेल तातडीने जी – उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले आहे.

धारावी, माहीम आणि दादर या जी उत्तर विभागात शनिवारी २७१ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीत ७४ तर दादरमध्ये ९४ रुग्ण आढळून आले. या शिवाय महिममध्ये १०५ रुग्ण आढळून आले. माहीममध्ये सलग तिसऱ्या दिवशी १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे.आजवर इमारतीत आढळून येणारे रुग्ण आता हॉटेलमध्येही आढळून येऊ लागले आहे.

माहीम माटुंगा पश्चिम येथील टी. एच. कटारिया मार्ग आणि एल. जे. रोड जंक्शनवर असलेल्या शोभा हॉटेलमधील एक कर्मचारी शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तेथील सर्व कर्मचाऱ्यांच्या चाचणी करण्यात आल्या.या चाचणीत १० कामगार पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे हे हॉटेल जी- उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित ग्राहकांसाठी बंद करून सील केले असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here