वैमानिकाच्या प्रसंगावधानाने दुर्घटना टळली! नागपूर-हैद्राबाद विमानाचे सुखरुप लॅंडिंग

नागपूरहून हैद्राबाद येथे जाणा-या जेट सर्व्ह कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्या विमानाचे मुंबई विमानतळावर इमरजंन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे फार मोठा अपघात टळला आहे. वैमानिक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील स्टाफच्या प्रसंगावधानामुळेच अपघात टळला आहे.

सुखरुप लॅंडिंग

मिळालेल्या माहितीनुसार, जेट सर्व्ह कंपनीचे विमान नागपूरहून हैद्राबाद येथे जात होते. नागपूरहून टेक-ऑफ घेताना या विमानाचे चाक निखळले होते. हे लक्षात येताच विमानाचे वैमानिक केसरी सिंग यांनी प्रसंगावधान राखत या विमानाचे इमरजंन्सी बेली लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबई विमानतळाला अलर्ट देण्यात आला. सर्वात लांब धावपट्टी मिळावी, यासाठी हे विमान छ.शिवाजी महाराज विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. या विमानतळाचे सुखरुप लॅंडिंग करण्यात आले असून, विमानातील सर्व जण सुखरुप आहेत.

काय असते बेली लॅंडिंग?

जेव्हा विमानाचे चाक निखळलेले असते, तेव्हा विमान पोटावर उतरवले जाते. म्हणून त्याला इमरजंन्सी लॅंडिंग असं म्हणतात. अशावेळी विमानातील इंधन पेट घेऊन, आग लागण्याचा मोठा धोका असतो. म्हणून विमानातील इंधन आधी संपवले जाते आणि मग ते उतरवले जाते. या विमानाच्या लॅंडिंगसाठी सुद्धा असे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here