मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

87

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी ब्रिझा कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्दैवाने तिन्ही मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

चारचाकी वाहनाची ट्रकला धडक

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कारमध्ये धानिवरी येथे हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये दीपक अग्रवाल, सुमित्रा अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल यांचा समावेश आहे. तर केतन अग्रवाल हा जखमी आहे. समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने भरधाव ब्रीझा कारने मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

(हेही वाचा ब्रिटनभोवती मुसलमानांचा विळखा, नव्या जनगणनेत धक्कादायक आकडेवारी समोर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.