Tirupati लाडू घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई; SIT कडून चौघांना अटक  

111

तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple Ladoo Scam) वादावर मोठी अपडेट समोर येत आहे. मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये वापरले जाणारे घी पुरवणाऱ्या पुरवठादारांवर सीबीआय पथकाने (CBI Action) मोठी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भोले बाबा डेअरीचे माजी संचालक विपिन जैन आणि पोमिल जैन, वैष्णवी डेअरीचे अपूर्व चावडा आणि एआर डेअरीचे राजू राजशेखरन यांना अटक करण्यात आली आहे. लाडू वादामध्ये (Laddu controversy) ही कारवाई कऱण्यात आल्याने मंदिर प्रशासनाला ही मोठी चपराक आहे. तसेच यातील काही आरोपींना उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आले आहे. (Tirupati)

मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींना सोमवारी तिरुपती येथील न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने रविवारी रात्री उशिरा सांगितले की, दोन व्यक्ती म्हणजे बिपिन जैन आणि पोमिल जैन हे भोलेबाबा डेअरीमधील आहेत. अपूर्व चावडा वैष्णवी डेअरीशी संबंधित आहे. राजशेखरन एआर डेअरीशी संबंधित आहेत. एसआयटीच्या चौकशीत तूप पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनियमितता उघडकीस आली आहे. ज्यामुळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर आरोप आहे की, वैष्णवी डेअरीच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला तूप पुरवण्यासाठी एआर डेअरीच्या नावाने निविदा मिळवल्या आणि निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी बनावट रेकॉर्ड तयार करण्यातही त्यांचा सहभाग होता.

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : भारत – इंग्लंड सामन्यादरम्यानच्या फ्लडलाईट व्यत्ययावर ओडिशा क्रिकेट असोसिएशनकडे मागितली दाद )

विशेष तपास पथकात पाच सदस्य सूत्रांनी सांगितले की, एसआयटीने उघड केले की वैष्णवी डेअरीने भोले बाबा डेअरीकडून तूप खरेदी केल्याचा खोटा दावा केला होता. तर तपास करताना अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, भोलेबाबा डेअरीकडे तिरुमला तिरुपती देवस्थानमची (Tirumala Tirupati Temple) मागणी पूर्ण करण्याची क्षमता नाही. तिरुपती लाडू बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ५ सदस्यांची एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीमध्ये केंद्रीय संस्थेचे दोन अधिकारी, आंध्र प्रदेश पोलिसांचे दोन अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचा एक अधिकारी यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – धार्मिक द्वेष पसरवल्याप्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर एफआयआर दाखल )
नेमकं प्रकरण काय?

श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात म्हणजे तिरुपती मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या तिरुपती लाडूंमध्ये भेसळ आढळून आली होती. लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचे उघड झाले होते. एसआयटीच्या तपासात तूप पुरवठ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनियमितता उघडकीस आली, त्यामुळे ही अटकेची कारवाई करण्यात आली. तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (CM N Chandrababu Naidu) यांनी सप्टेंबरमध्ये असा आरोप केला होता की, राज्यात वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात तिरुपती लाडू बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. नायडू यांच्या या विधानामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.