कुर्ला येथील गुलाब इस्टेट या भागातील गोदामांना बुधवार, ७ मार्च रोजी, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी शेकडो गोदामे आहेत. वाहनांच्या सुट्या भागांची ही गोदामे आहेत. येथील गोदामे अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात आहेत. त्यामुळे एकामागोमाग एक गोदामे आगीच्या कचाट्यात सापडली. येथील परिसर गल्लीबोळाचा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड अडचणी आल्या. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. आधी झाडूच्या गोदामाला आग लागली त्यानंतर ही आग पसरली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही, तसेच जीवित हानी झाली का, याबाबतही माहिती मिळू शकली नाही.
(हेही वाचा : घाऊक भाजी मार्केट दादरलाच भरले जाणार!)