खलिस्तानवादी अतिरेकी Gurpatwant Singh Pannu वर एनआयएची मोठी कारवाई, चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त

105
खलिस्तानवादी अतिरेकी Gurpatwant Singh Pannu वर एनआयएची मोठी कारवाई, चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त
खलिस्तानवादी अतिरेकी Gurpatwant Singh Pannu वर एनआयएची मोठी कारवाई, चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त

भारताच्या तपास यंत्रणेने खलिस्तानी अतिरेकी (Khalistani militants) गुरपतवंत सिंग पन्नूवर कडक कारवाई करण्यात आलीआहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पन्नूवर मोठी कारवाई केली. एजन्सी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) विरुद्ध दाखल झालेल्या 6 प्रकरणांची चौकशी करत असून या अंतर्गत त्यांची भारतातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (Gurpatwant Singh Pannu)

एनआयएने चंदीगडमधील पन्नूच्या एका अपार्टमेंटसह तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत. याशिवाय अमृतसरमधील 46 कनाल आणि पठाणकोटमधील 11 आणि 13.5 कनाल जमीनही जप्त करण्यात आली आहे. एनआयएने () त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने यावर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत एकूण 66 प्रकरणे नोंदवली आहेत, ज्यामध्ये दोषी ठरविण्याचे प्रमाण 95.13% आहे. देशात रेल्वे अपघात घडवून आणण्याचा कट रचल्याप्रकरणी एनआयएने पहिल्या चार अपघातांच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

(हेही वाचा – विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्राचा वाटा मोठा; S. Jaishankar यांचे प्रतिपादन)

तपास यंत्रणेने पन्नूविरोधात रेड कॉर्नर नोटीसही (Red Corner Notice) जारी केली होती. खलिस्तानी अतिरेकी पन्नू रोज सोशल मीडियावर भारताविरोधात बोलत असतो. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता, त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाही (Treason trial) प्रलंबित आहे. या क्रमाने NIA ने शुक्रवारी त्यांची मालमत्ता (Pannu’s property seized) जप्त केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.