Paral TT Flyover : परळ टीटी उड्डाणपुलाची येत्या काही दिवसात मोठी दुरूस्ती

परळ टीटी उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सध्या सुरू असेल तरी शिवडी-न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर रस्ता वाहनचालकांच्या सेवेत आल्यानंतर या पुलाच्या संपूर्ण कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

1086
Paral TT Flyover : परळ टीटी उड्डाणपुलाची येत्या काही दिवसात मोठी दुरूस्ती
Paral TT Flyover : परळ टीटी उड्डाणपुलाची येत्या काही दिवसात मोठी दुरूस्ती

परळ टीटी उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सध्या सुरू असेल तरी शिवडी-न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर रस्ता वाहनचालकांच्या सेवेत आल्यानंतर या पुलाच्या संपूर्ण कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. जेणेकरून परेल टि टी पुलावरील वाहतुकीचा भार कमी होईल आणि त्यावरील उर्वरित दुरुस्तीची मोठी कामे करणे शक्य होईल, असे पूल विभागाचे प्रमुख अभियंता (पूल)विवेक कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहेपरळ टीटी उड्डाणपूल संपूर्ण दुरूस्तीसाठीच्या वाहतूक पोलीस विभागाच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. तसेच आगामी कालावधीत होणाऱ्या मुख्य कामांसाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागामार्फत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मुख्य कामालाही येत्या काही दिवसात सुरूवात होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. (Paral TT Flyover)

(हेही वाचा – Aadhar Card Update : आधारसाठी अतिरिक्त शुल्क आकरल्यास लागणार ५० हजाराचा दंड)

दक्षिण मुंबईतील महत्वाच्या पुलांपैकी एक अशा परळ टीटी उड्डाणपुलावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाहणी दौऱ्यादरम्यान या पुलावर प्रत्यक्ष भेट दिली असता, त्यांनी याची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांची पूर्तता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. दुरूस्तीचा एक भाग म्हणून पुलावरील पुनर्पृष्ठिकरणाचे महानगरपालिकेमार्फत पूर्ण करण्यात आले आहे. (Paral TT Flyover)

परळ टीटी उड्डाणपुलाच्या संपूर्ण दुरूस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत नियोजित आहे. परंतु, मुंबईतील नागरिकांना तसेच वाहनचालकांना रस्ते प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्वात आधी या उड्डाणपुलाच्या रस्त्याचे पुनर्पृष्ठिकरण तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणीवेळी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, या पुलावरील रस्त्याच्या दुतर्फा डांबराचा थर बदलण्याचे काम मागील आठवड्यात हाती घेण्यात आले. (Paral TT Flyover)

New Project 14 3

(हेही वाचा – Land Rover Range Rover Evoque 2023 : नवीन वर्षात रेंज ओव्हर इलोकला मिळणार फेसलिफ्ट)

वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून ही कार्यवाही रात्रीच्या वेळेत करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला दिले होते आणि डागडुजीचे काम देखील हाती घेण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार दररोज रात्री ९.३० ते सकाळी ७ या कालावधीत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी वेळोवेळी आढावा घेत परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा दैनंदिन पाठपुरावा केला. (Paral TT Flyover)

‘या’ दुरूस्तींवर भर

पूल विभागाने दररोज अथक काम करून आठवड्यात ही दुरुस्ती पूर्ण केली आहे, रस्त्याचे डांबरीकरण व प्रसरण सांधे मुख्यत्वे करून भरण्यात आहेत, अशी माहिती उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर म्हणाले की, परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरूस्तीसाठी पूल विभागाने मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहतूक नियोजन करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती. त्यानुसार या कामाला गत आठवड्यात सुरूवात झाली. या अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजुला २५० मीटर अंतर टप्प्यात डांबर बदलण्यात आले आहे. काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहनचालकांनाही अडथळा येत होता. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग सपाटीकरण आणि प्रसरण सांध्यांच्या दुरूस्तीवर भर देण्यात आला. दुरुस्ती नंतर आता दादरच्या दिशेने तसेच दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कल्याणकर यांनी दिली. (Paral TT Flyover)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.