महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत कडक कायदा करावा. ऐतिहासिक चित्रफीत किंवा चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्डाने परवानगी देताना इतिहास तज्ज्ञांच्या कमिटीची प्रथम मान्यता घेण्याचे बंधन घालावे आदी मागण्या गृहमंत्री अमित शाह यांना भेटून खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांनी केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशाची राजधानी दिल्ली येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांस जबर शासन होण्यासाठी सुसंगत, असा कडक कायदा करावा, पर्यटन मंत्रालयाअंतर्गत शिवस्वराज्य सर्किट विकसित करावे, या प्रमुख मागण्यांसह छत्रपती शिवाजी महाराज यांचा अधिकृत इतिहास प्रसिद्ध करावा, आदी मागण्यांसाठी खासदार उदयनराजे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
(हेही वाचा – Bangladeshi infiltrators : मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार आणि बनावट पासपोर्ट)
खासदार उदयनराजे दिल्लीत असून जिल्ह्यासह इतर मागण्यांसाठी ते केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यावेळी त्यांनी गुरुवारी (२८ डिसेंबर) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारावे. ऐतिहासिक कालखंडातील प्रसंगाचे मूल्य अधिकृत करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून पुरातत्त्व विभागाच्या वतीने प्रसिद्ध झालेले तसेच अप्रसिद्ध राहिलेले दस्ताऐवज, चित्रे, शस्रागाराची माहिती एकत्रित करून तो अधिकृत इतिहास शासनाने प्रसिद्ध करावा तसेच विदेशात असलेले ऐतिहासिक दस्तावेज भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
(हेही वाचा – Bangladeshi infiltrators : मृत महिलेच्या नावावर 6 बांगलादेशी घुसखोरांचा बनावट भाडे करार आणि बनावट पासपोर्ट)
अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत अवमानजनक वक्तव्ये केली गेली. त्यामधून सामाजिक तेढ निर्माण निर्माण झाली होती. त्यासंदर्भात कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन अशा घटना घडू नयेत आणि महापुरुषांच्या बाबतीत अवमानजनक वक्तव्य केल्यास कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा संसदेत पारीत करावा तसेच ऐतिहासिक चित्रपटांवर नियंत्रण ठेवणारी सेन्सॉर कमिटी स्थापन करावी याशिवाय केंद्राने अधिकृत ठरवलेला इतिहासच शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये प्रसिद्ध करावा, अशा आग्रही मागण्या शाह यांच्याकडे उदयनराजेंनी केल्या आहेत.
या मागण्यांबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व मु्द्दे समजून घेऊन यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले आहे. येत्या काही दिवसांत याबाबत हालचाली सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.