BMC : कुलाब्यात महिला उद्यान बनवा, माजी नगरसेवक ऍड नार्वेकर यांची महापालिकेला सूचना

"कंत्राटदारांकडून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी, बीएमसीने अशा पार्किंग लॉटमध्ये पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू केली पाहिजे. ही डिजिटल पेमेंट प्रणाली FASTag सोबत जोडून पारदर्शकपणे शुल्क आकारणी केली पाहिजे," नार्वेकर म्हणाले.

340
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त

पे-अँड-पार्क ठिकाणी जादा शुल्क आकारणी टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करावी तसेच कुलाब्यातील उद्यान हे फक्त महिलांसाठी राखीव ठेवावे आणि त्याला स्व. सुषमा स्वराज महिला उद्यान असे नाव द्यावे, अशी सूचना माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी महापालिका सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्प करता मागवण्यात आलेल्या शिफारशी व सूचना द्वारे केली आहे. (BMC)

कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी मुख्य लेखापाल (वित्त) यांच्याकडे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरता लेखी सूचना सादर केल्या. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सन २०२४-२५ या अर्थसंकल्पात लोक सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून याबाबत सूचना तथा शैर्शी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी या सूचना केल्या. या सूचनामध्ये त्यांनी क्रॉफर्ड मार्केट येथील ‘पे-अँड-पार्क’ कंत्राटदाराकडून जादा शुल्क आकारल्याच्या नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ देत नार्वेकर म्हणाले, कंत्राटदाराने वाहनचालकांकडून जादा शुल्क आकारण्याची ही एक एकमेव घटना नाही. तर सर्व पे-अँड-पार्क लॉटमध्ये अशी प्रकरणे सर्रासपणे सुरू आहेत. (BMC)

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता; श्रीकांत देशपांडे यांची माहिती)

पारदर्शकपणे शुल्क आकारणी करावी

“कंत्राटदारांकडून नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी, बीएमसीने अशा पार्किंग लॉटमध्ये पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू केली पाहिजे. ही डिजिटल पेमेंट प्रणाली FASTag सोबत जोडून पारदर्शकपणे शुल्क आकारणी केली पाहिजे,” नार्वेकर म्हणाले. याबरोबरच नार्वेकर (Makarand Narvekar) यांनी महापालिकेला कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील दीपक जोग चौकातील उद्यान “फक्त महिलांसाठी” राखीव ठेवण्याची आणि त्याला “स्व. सुषमा स्वराज महिला उद्यान” असे नाव द्यावे अशीही मागणी केली आहे. (BMC)

“मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असूनही, संपूर्ण शहरात केवळ महिलांसाठी एकही राखीव उद्यान नाही. लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव बोगी, बेस्टच्या बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा असूनही, फक्त महिलांसाठी उद्याने मुंबईत अजूनही नाहीत. त्यामुळे केवळ महिला उद्यानांची गरज आहे आणि कुलाब्यातील दीपक जोग चौकातील उद्यान हे फक्त पहिले महिला उद्यान होऊ शकते,” असेही ते म्हणाले. (BMC)

(हेही वाचा – Pakistan ने राम मंदिराचा निषेध केल्यानंतर धार्मिक तेढ)

सुषमा स्वराज यांच्यासाठी योग्य आदरांजली

नार्वेकर पुढे म्हणाले की पुतळे, रस्त्यांची आणि उद्यानांची नावे व्यक्ती आणि समूहाचे कार्य ठळकपणे ओळख निर्माण करण्याची भावना निर्माण करू शकतात. “भाजपच्या दिग्गज राजकारणी सुषमा स्वराज या भारताच्या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि लोकसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. त्या आधुनिक भारतातील महिला शक्तीच्या प्रेरणा होत्या. या फक्त महिला उद्यानाला त्यांचे नाव देणे हे त्यांच्यासाठी योग्य आदरांजली ठरेल आणि त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेण्यास मदत करेल,” असे नार्वेकर (Makarand Narvekar) म्हणाले. (BMC)

नरिमन पॉईंट आणि बीकेसी सारख्या सेंट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्टच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी महापालिकेने एक स्वतंत्र सहाय्यक महापालिका आयुक्त नियुक्त करणे आवश्यक आहे, असेही नार्वेकर यांनी पुढे सुचवले आहे. लोक त्यांच्या जीवनात किती समाधानी आहेत याचे भावनिक मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यानुसार नागरी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई शहराचे हॅपिनेस सर्व्हे (Happiness Survey) ही महापालिकेने केला पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.