मुंबईत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा; DCM Eknath Shinde यांचे निर्देश

96
मुंबईत पावसाळ्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा; DCM Eknath Shinde यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

मुंबईतील रस्त्यांना कायमस्वरूपी खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचा निर्णय घेण्यात आला असून, मे २०२५ अखेरपर्यंत काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले. कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक रस्ते वाहतूकयोग्य करण्याचे आणि मॅनहोल, सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता प्राधान्याने करण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा – मुंबई योग्य दिशेने आणि वेगाने…; Dr. Bhushan Gagrani यांनी दिले दाखले)

उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी मंगळवारी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील काँक्रीट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पाहणी बॉम्बे हॉस्पिटलजवळील चौकापासून सुरू होऊन सी विभाग (आर.एस. सप्रे मार्ग), एफ उत्तर विभाग (माटुंगा, जामे जमशेद मार्ग) आणि एम पश्चिम विभाग (चेंबूर, मार्ग क्रमांक २१) येथील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

(हेही वाचा – भारताला आर्थिक महासत्ता करायचे असेल तर गाव-खेड्यांचा विकास करा; Nitin Gadkari यांचे महत्त्वाचे विधान)

आतापर्यंत १,३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) आणि दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१,४२० रस्ते) काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. एम-४० ग्रेड काँक्रीटचा वापर केला जात असून, हे रस्ते उच्च भारक्षमता सहन करू शकतात. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक असलेले फलक लावण्याचे निर्देश दिले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान आणि चुकीच्या कामावर कारवाई होईल, असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.