जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा; CM Devendra Fadnavis यांची सूचना

48
जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा; CM Devendra Fadnavis यांची सूचना
  • प्रतिनिधी

गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने पिडीत रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात विशेष उपचार व्यवस्था करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत घेतलेल्या आढाव्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सुचनांची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाने जीबीएस संदर्भात सादरीकरण केले, आणि या संदर्भात रुग्णांना उत्तम उपचार मिळवून देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पण रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.

(हेही वाचा – MHADA मध्ये सदनिका मिळवून देण्याच्या बहाण्याने ६०० लोकांची फसवणूक)

जीबीएसवर उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहे. याशिवाय, दूषित पाणी आणि न शिजवलेले अन्न खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचे अन्न टाळावे आणि पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला आहे, यासाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. (CM Devendra Fadnavis)

पुण्यात सध्या १११ रुग्ण आहेत, त्यापैकी ८० रुग्ण ५ किमीच्या परिघात आहेत. चाचण्या घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जात आहे. जीबीएसमुळे पुण्यात एक मृत्यू झाला आहे, पण त्याची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. बुलडाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकार आता नियंत्रणात आले असून, त्याबाबत पुढील निर्णय ‘आयसीएमआर’ कडून अहवाल प्राप्त झाल्यावर घेण्यात येईल. पुण्यात उपचारासाठी कमला नेहरू रुग्णालय आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालय यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.