बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा; Adv. Ashish Shelar यांचे निर्देश

30
बोर्डाची वेबसाईट सायबर सुरक्षित करा; Adv. Ashish Shelar यांचे निर्देश
  • प्रतिनिधी

दहावी व बारावीच्या निकालाच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटची क्षमता वाढवावी तसेच ती सायबर सुरक्षित करावी, असे स्पष्ट निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

निकालाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा वेबसाईटवर ताण येतो. त्यामुळे अनेकदा वेबसाईट ‘क्रॅश’ होते आणि विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या यंदा उद्भवू नये, यासाठी सोमवारी अ‍ॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंडळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सदाम आंधळे उपस्थित होते.

(हेही वाचा – Tamil Nadu मध्ये मंत्र्यांच्या निवासासह अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी)

वेबसाईटची क्षमता वाढवा, सायबर सुरक्षेवर भर द्या

अ‍ॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी बैठकीत स्पष्ट केले की, निकालाच्या दिवशी लाखो विद्यार्थी एकाच वेळी वेबसाईटवर लॉग इन करत असल्याने ती साईट डाऊन होते. त्यामुळे या वेबसाइटवर सतत लोड टेस्टिंग करण्यात यावे, तिची सद्यस्थितीतील क्षमता काय आहे, याचा अहवाल तयार करून त्यानुसार क्षमता वाढवण्याचे उपाय शोधावेत, असे त्यांनी निर्देश दिले.

तसेच, विद्यार्थ्यांच्या संवेदनशील माहितीचा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यामुळे वेबसाईट सायबर अ‍ॅटॅकपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती सुरक्षा प्रणाली आवश्यक आहे, यासंदर्भातही सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

(हेही वाचा – Akshay Shinde चकमकप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करा; उच्च न्यायालयाचा आदेश)

महत्वाचे मुद्दे :
  • वेबसाईटवर येणाऱ्या लोडचे लोड टेस्टिंग करण्यात यावे.
  • सध्याच्या सिस्टीमची क्षमता आणि मर्यादा ओळखून ती वाढवावी.
  • सायबर सुरक्षेसाठी आधुनिक उपाययोजना राबवाव्यात.
  • सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा.

राज्य शासनाच्या या पावलामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने निकाल पाहता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.