Malabar Hill Reservoir Reconstruction : सोमवारी शहर भागात दहा टक्के पाणीकपात

पुनर्बांधणी करण्यासाठी स्थानिकांचा विरोध असल्याने याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

634
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या
Malabar Hill Reservoir Reconstruction : दक्षिण मुंबईकरांनो पाणी गाळून आणि उकळून प्या

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आल्याने तज्ज्ञ समितीमार्फत सोमवारी १८ डिसेंबर २०२३ रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक १ रिक्त करणे आवश्यक असून या कालावधीत शहर भागात १० टक्के पाणी कपात केले जाणार आहे. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

मलबार हिल जलाशयातून मुंबई शहराला पाण्याचा पुरवठा केला जात असून या हे जलाशय जुने झाल्याने याची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु याला स्थानिकांचा विरोध असल्याने याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या जलाशयाची दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

(हेही वाचा – Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेला मनुष्यबळाची कमतरता तर कारणीभूत नाही ना?)

सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करुन या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत येत्या सोमवारी १८ डिसेंबर २०२३ रोजी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक १ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. सोमवारी १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे.या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक १ रिक्त करणे आवश्यक असून हा कप्पा रिक्त केल्याने मुंबई शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

या कामामुळे सोमवार शहर भागातील काही विभागात पाणीपुरवठा होईल, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. या कालावधीत पाण्याळचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने स्पष्ट केले. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

(हेही वाचा – Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेला मनुष्यबळाची कमतरता तर कारणीभूत नाही ना?)
या भागांमध्ये अशाप्रकारे राहणार पाणीकपात
‘ए’ विभाग-

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

‘सी’ विभाग-

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्र पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

‘डी’ विभाग-

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

‘जी दक्षिण व जी उत्तर’ विभाग-

जी दक्षिण व जी उत्तर विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. (Malabar Hill Reservoir Reconstruction)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.