येत्या सप्टेंबर पर्यंत मालाड आणि दहिसरमधील स्विमिंग पूल खुले होणार

मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पाच जलतरण तलावांपैकी(स्विमिंग पूल) मालाड आणि दहिसर येथील जलतरण तलाव येत्या सप्टेंबर महिन्यांपर्यत लोकांसाठी खुली करून देण्यात येणार आहेत. तर अंधेरीतील जलतरण तलाव पुढील वर्षी मार्च महिन्यांपर्यंत खुले केले जाणार आहे. मालाड आणि दहिसर या दोन्ही जलतरण तलावांची कामे ८० ते ८५ टक्के पूर्ण झाली आहेत.

तरण तलावांची कामे ८० ते ८५ टक्के पूर्ण

मुंबई महापालिकेची दादरमधील महात्मा गांधी ऑलिम्पिक जलतरण तलाव, चेंबूर, अंधेरी राजे शहाजी क्रीडा संकुल, कांदिवली, मुलुंड आदी ७ ठिकाणी जलतरण तलाव आहे. या जलतरण तलावांमधून शुल्क आकारून पोहोण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. परंतु तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या निर्देशानुसार ७ परिमंडळात प्रत्येकी एक तरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला होता.

त्यातील मालाड चाचा नेहरु मैदान परिसर आणि दहिसर पश्चिम परिसरातील आर.टी.ओ. अंधेरी कोंडीविटा, विक्रोळी पूर्व परिसरातील टागोर नगर मधील राजर्षी शाहू क्रीडांगणाच्या परिसरात तसेच वरळी हिल रिझर्व्हायर आदी पाच ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. त्यातील मालाड व दहिसर या दोन तरण तलावांची कामे ८० ते ८५ टक्के पूर्ण झाली असू असून दोन्ही तरण तलाव येत्या पावसाळयानंतर सप्टेंबर पर्यंत खुली करून देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. तर अंधेरी कोंडीविटा येथील तरण तलावाचे नवीन वर्षात मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होतील तर त्या पुढे मे २०२३ पर्यंत विक्रोळी आणि वरळी हे दोन्ही तरण तलावांची कामे पूर्ण होतील असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे.

( हेही वाचा : मनसे नेते वसंत मोरे ‘त्या’ महिलेसाठी बनले ‘दीर’)

महापालिकेच्या संबंधित विभागाचे उपायुक्त किशोर गांधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिकेने हाती घेतलेल्या पाच तरण तलावांपैकी मालाड आणि दहिसर या दोन तलावांची कामे जवळपास होत आली आहेत. १० ते १५ टक्के कामे शिल्लक आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही तलाव खुली करून देण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here