Malad Building Collapse: बांधकाम सुरू असताना २०व्या मजल्यावरुन ४ मजूर कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू

243
Malad Building Collapse: बांधकाम सुरू असताना २०व्या मजल्यावरुन ४ मजूर कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू
Malad Building Collapse: बांधकाम सुरू असताना २०व्या मजल्यावरुन ४ मजूर कोसळले; दोघांचा जागीच मृत्यू

मालाड पूर्व येथे गुरुवारी (५ सप्टेंबर) दुपारी जी + २० मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना मालाड येथील एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्ती व्यवस्थापन युनिटनुसार, मजूर इमारतीच्या २० व्या मजल्यावर काम करत असताना दुपारच्या सुमारास ही घटना घडली. (Malad Building Collapse)

(हेही वाचा – T20 World Record : ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत चोपल्या ११३ धावा, टी-२० तील अनेक विक्रम धारातीर्थी)

मालाड पूर्व येथील गोविंद नगर (Malad east Govind Nagar) येथील नवजीवन बिल्डिंगमध्ये (Navjeevan building SRA collapsed) बांधकाम सुरू होते. बीएमसीच्या १९१६ टोल फ्री क्रमांकावर या घटनेची तक्रार करण्यात आली. ग्राउंड-प्लस -२० संरचनेच्या २० व्या मजल्यावरून स्लॅबचा एक भाग कोसळला, असे एका महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही इमारत विक्रीयोग्य SRA प्रकल्पाचा भाग आहे आणि काही कामगार ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

(हेही वाचा – Shiv Sena UBT ने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या १५०० रुपयांची तुलना केली ‘दारूच्या पेग’शी)

एकूण चार मजूर जखमी झाल्याची माहिती मिळाली, त्यापैकी दोघांना हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मृत घोषित करण्यात आले. इतर दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (Malad Building Collapse)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.