Malad : रस्त्यांवरील अवैध कार पार्किंग, खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाल्यांमुळे मालाडकर त्रस्त

1033
Malad : रस्त्यांवरील अवैध कार पार्किंग, खाद्यपदार्थ विक्रेते, फेरीवाल्यांमुळे मालाडकर त्रस्त

दादरप्रमाणेच आता मालाड पूर्व भागातील जनतेची बेकायदेशीर उभी केलेली वाहने आणि फेरीवाल्यांसह खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे होणाऱ्या समस्येने डोके वर काढले आहे. मालाड पूर्वेतील अनधिकृत वाहन पार्किंग आणि अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह फेरीवाल्यांमुळे मालाडमधील जनता त्रस्त झाली असून यातून मालाडकरांची कधी सुटका करणार सवाल महापालिकेसह वाहतूक पोलिसांना केला जात आहे. (Malad)

मालाड पूर्व येथील पारेख नगर महापालिका शाळेपासून ते अण्णाभाऊ साठे चौक, मलिका हॉटेल ते रमेश हॉटेलपर्यंत तसेच ज्योती हॉटेल ते शिवाजी नगर जंक्शन या रस्त्यांवर मागील अनेक महिन्यांपासून बेकायदेशीर गाड्याउभ्या केल्या जात आहेत. या बेकायदेशीर पार्किंगमुळे आणि पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते आणि फेरीवाले यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून ना नागरिकांना धड चालता येत ना वाहन चालकांना धड वाहने चालवता येत. (Malad)

(हेही वाचा – BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा)

मालाडमधील या समस्येमुळे जनता त्रस्त असल्याने महापालिकेचे भाजपाचे माजी पक्षनेते, माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी परिमंडळ उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या समवेत महापालिका अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत बेकायदेशीर कार पार्किंगमुळे निर्माण होणारी समस्या आणि फेरीवाल्यांमुळे होणारा त्रास याबाबत चर्चा करण्यात आली. (Malad)

यावेळी झालेल्या बैठकीत अवैध कार पार्किंगसह गती रोधक आणि नो पार्किंग झोन तयार करण्याच्या सुचना केल्या आहे. तसेच कुरार व्हिलेजमधील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आणि आदींवर चर्चा करून याबाबतच्या त्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत त्यानुसार कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. (Malad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.