मालाडमधील मैदानात अवजड वाहनांची ये-जा, संबंधितांवर कारवाई न केल्याने MNS कडून अधिकाऱ्यांना शाल आणि श्रीफळ भेट

1041
मालाडमधील मैदानात अवजड वाहनांची ये-जा, संबंधितांवर कारवाई न केल्याने MNS कडून अधिकाऱ्यांना शाल आणि श्रीफळ भेट
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिका मैदानातून अवजड वाहने ये-जा करण्यास बंदी असतानही मालाड येथील लिबर्टी गार्डन शेजारी चाचा नेहरु क्रिडांगणामधून विकासकाच्या वाहनांना यामध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने स्थानिकांच्या तक्रारीनुसार मनसेचे (MNS) विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांनी महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण त्यानंतरही याची दखल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतली न गेल्याने याचा निषेध अनोख्या पद्धतीने नोंदवला. विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता आणि पी उत्तर विभागाचे सहायक उद्यान अधिक्षक यांना विकासकाला मदत करून जनतेचे मैदान त्यांच्यासाठीच खुले करून दिल्याबद्दल शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

मालाडमधील महापालिका मैदानातून अवजड वाहने ये-जा करत असल्याने स्थानिक नागरिकांनी मनसे (MNS)  विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांच्याकडे या बाबत तक्रार केली. त्यानंतर ऍड. भास्कर परब यांनी ही बाब विकास नियोजन इमारत प्रस्ताव विभागाचे प्रमुख अभियंता, पश्चिम उपनगर दोनचे उपप्रमुख अभियंता, पी उत्तर विभागातील उद्यान विभागाच अधिकारी यांच्याशी यांच्याशी संपर्क साधून मैदानाचे प्रवेशद्वार तत्काळ बंद करून संबंधित विकासक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जून महिन्यात केली होती.

(हेही वाचा – Sardar Patel Engineering College: मुंबईतील प्राध्यापकाला विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन भोवलं; कारवाई करत, पगारवाढ रोखली)

परंतु सातत्याने पाठवापुरवा करूनही यावर संबंधितांवर कारवाई न करता निष्क्रिय अधिकारी मुंबईकरांच्या हक्काचे मैदान असललेल्या महापालिका भूखंड बळकावण्यासाठी विकासकास मदत करत असल्यामुळे बुधवारी मनसे (MNS)  विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांनी विभागातील कार्यकर्त्यांसह व नागरिकांसह प्रमुख अभियंता (विकास नियोजन) सुनिल राठोड आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक (पी/उत्तर) योगेंद्रसिंग कच्छावा यांची भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

आधीच मुंबईकरांसाठी खुल्या आणि मोकळ्या जागा कमी आहेत. त्यात जर धनदांडग्यांनी मुंबईकरांच्या उद्यानांच्या खुल्या जागांवर डल्ला मारला तर सामान्य मुंबईकरांनी जायचे कुठे हा प्रश्न उपस्थित केला. या सामान्य मुंबईकरांच्या हक्कासाठी मनसे नेहमीच अग्रेसर असेल अशी माहिती मनसे (MNS)  विभाग अध्यक्ष ऍड. भास्कर परब यांनी दिली. या पुढे जर मैदान सर्वांसाठी खुले न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, पण मुंबईकरांच्या हक्काची जागा मिळवून देईलच असा विश्वास भास्कर परब यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.