Malad sewage treatment plant : अखेर मालाड मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पासाठी सल्लागाराची निवड

विविध करांसह ४७.७८ कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात येत आहे

184
Malad sewage treatment plant : अखेर मालाड मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पासाठी सल्लागाराची निवड
Malad sewage treatment plant : अखेर मालाड मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पासाठी सल्लागाराची निवड
मुंबईतील सात मलजल विभागांपैकी एक असलेल्या सध्याच्या मालाड येथील मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र प्रकल्पाचे काम जुलै २०२२मध्ये सुरु झाल्यानंतर आता तब्बल वर्षांनतर सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे. चार वेळा निविदा रद्द केल्यानंतर अखेर पात्र निविदाकाराची निवड करून प्रकल्प व्यवस्थापन  सल्लागाराची नेमणूक करण्यात येत आहे. या कामासाठी  निवड करण्यात आली असून विविध करांसह ४७.४८ कोटी रुपये  सल्लागार  सेवेवर खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेने सन  २००२ साली ‘मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा – २ (Malad sewage treatment plant) सुसाध्यता अभ्यास’ पूर्ण  करत मलनिःसारण प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासह  मलजलावर प्रक्रिया करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सात मलजल प्रक्रिया केंद्राचे काम हाती घेतले असून त्याअंतर्गत मालाड येथे नविन मलजल प्रक्रिया सुविधा केंद्राचे कामाला जुलै- २०२२ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. मालाड मलजल प्रक्रिया केंद्र   अंतर्गत  ४५४ दशलक्ष लीटर प्रती दिन क्षमतेचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी  सीसी लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याची कंत्राट किंमत  ही सुमारे ६३७० कोटी रुपये आणि विविध करांसह १०,४५० कोटी रुपये एवढी आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा नियुक्त करण्यासाठी यापूर्वी तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या, परंतु काही तांत्रिक वा प्रशासकीय कारणास्तव या निविदा रद्द करण्यात आल्याने सल्लागाराची नियुक्ती करता आलेली नाही. त्यामुळे चौथ्यांदा यासाठी निविदा मागवण्यात आली. सन २०१९ ते २०२३ दरम्यान एकूण चार वेळा निविदा मागवण्यात आली आहे.

(हेही वाचा-Google Pixel : गुगल पिक्सल फोनचं उत्पादन भारतात करण्याचा गुगलचा निर्णय)

सन २०२० मध्ये मागवलेल्या निविदेमध्ये टाटा कन्सल्टींग इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली होती. या कंपनीने ४२.५० कोटी  रुपयांची बोली लावून काम मिळवले होते. परंतु या कंपनीची आधीच तीन प्रकल्पांच्या कामांमध्ये सल्लागार सेवा घेतली जात असल्याने दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीची निविड करण्याचा  निर्णय घेतला. परंतु कायदेशीर बाबींमध्ये ही बाब बसत नसल्याने ही निविदा रद्द करण्यात आल्याने जानेवारी २०२३मध्ये पुन्हा निविदा मागवली.

यामध्ये आयएलएफ कंन्सल्टींग इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ३९.३५ कोटी रुपयांची बोली लावली. परंतु आर्थिक देकाराच्या सादरीकरणात त्रुटी आढळून आल्याने महापालिकेच्या कायदा विभागाच्या सल्ल्यानुसार हीसुध्दा निविदा रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा १४ जुलै २०२३ रोजी पुन्हा निविदा मागवली. त्यात स्टूप कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ३३.८९ कोटी रुपयांची बोली लावली होती. जी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २१.८७ टक्के एवढी होती. त्यामुळे विविध करांसह ४७.७८ कोटी रुपयांचे कंत्राट या कंपनीला देण्यात येत आहे.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=Bp4JSaBrLVk

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.