मुंबईत २५ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे १८०, मलेरियाचे ५७० तर लेप्टोचे ३६ रुग्ण आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने जाहीर केली. गेल्या तीन वर्षांची नोंद पाहता मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण कमी असले तरीही नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. मच्छर आणि डासांपासून सावध रहा, असेही अधिका-यांनी सांगितले.
( हेही वाचा : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याचे मुंबई पोलिसांपुढे आव्हान)
सप्टेंबर महिना संपायला काही दिवसच शिल्लक असताना मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूसह लेप्टोचे ३६ रुग्ण आढळल्याने साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना आवश्यक काळजी घेतली जात नाही असे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आले. पावसाळा सुरु झाल्यापासून गॅस्ट्रोचे रुग्ण कमी जास्त दिसून आले होते. मुंबईत गॅस्ट्रोची रुग्णसंख्या २९६ हून अधिक नोंदवली गेली असून मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांपेक्षा गॅस्ट्रोचे रुग्ण कमी आहेत. हेपेटायटीसच्या रुग्णांची संख्या ५६, तर स्वाईन फ्लूची ७ जणांना बाधा झाली. चिकनगुनियाचे २ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
पालिकेचे आवाहन –
- डास, मच्छरांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी पूर्ण अंग झाकलेले कपडे घाला.
- अंथरुणालाही जाळी लावा
- छोट्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठायला देऊ नका. साठवलेले पाणी वारंवार बदला.
- ताप, डोकेदुखी, उलट्या आणि जुलाबावर घरगुती उपाय नको. तातडीने पालिका रुग्णालये किंवा दवाखान्यात भेट द्या.
Join Our WhatsApp Community