मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी (Malegaon Bomb Blast Case) सर्वोच्च न्यायालयाच्या (Suprime Court) निर्णयाचा वापर करून काँग्रेस पक्ष (Congress) आणि त्यांच्या समर्थकांनी ‘भगवा हिंदू दहशतवाद’ असा खोटा सिद्धांत निर्माण केला होता. त्यामुळे अशा घटकांना मोठा धक्का बसला आहे. कारण समीर शरद कुलकर्णी (Samir Sharad Kulkarni) यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. UAPA च्या कलम ४५ अंतर्गत त्याच्यावर खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घेण्यात आली नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै २०२४ मध्ये होणार आहे. (Malegaon Bomb Blast)
याच प्रकरणात विद्यमान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (MP Pragya Singh Thakur) यांनी ही गोवण्यात आले आहे. मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणा येथे काही दिवसांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचा अहवाल सादर केला, मात्र न्यायालयाने त्यांना नियमितपणे सुनावणीला हजर राहण्यास सांगितले. या सुनावणीत आपण सहकार्य करणार असल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले. स्वत: शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेपर्यंत तसेच शरीर साथ देईपर्यंत खटल्यात सहभागी होत राहील. असे साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव नाशिक येथे बॉम्बस्फोट झाला होता. (Malegaon Bomb Blast)
(हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत BJP गुजरातमध्ये शतप्रतिशतची हॅट्रिक करणार?)
समीर शरद कुलकर्णी यांना दिलासा देण्यासाठी वकील विष्णू शंकर जैन यांनी याचिका दाखल केली होती. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर इस्लामिक अतिक्रमणातून मुक्त करण्याबरोबरच मथुरा आणि भोजशाळेची प्रकरणेही ते लढवत आहेत. जैन म्हणाले की, हे छळवणुकीचे प्रकरण आहे, ज्यामध्ये ‘हिंदू दहशतवाद’ची खोटी थेअरी मांडण्यात आली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात ६ ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले. रमजानमध्ये लोक नमाज अदा कारण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. (Malegaon Bomb Blast)
याप्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत ३४ साक्षीदारांनी पलटी मारली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने हा खटला बेकायदेशीर ठरवला आहे, त्यामुळे समीर शरद कुलकर्णी यांच्या खटल्याला स्थगिती देण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे. याप्रकरणी तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारने अभिप्राय मागवला आहे. (Malegaon Bomb Blast)
(हेही वाचा – Fake Video Case : अमित शहांच्या बदनामी प्रकरणाशी जिग्नेश मेवाणींचा संबंध? दोन जणांना अटक )
समीर शरद कुलकर्णी यांच्यावर स्फोटासाठी रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप होता. ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होते. मे २०१९ मध्ये, जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे आणि संरक्षणाची मागणी केली होती. भारतीय लष्कराचे मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय आणि भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रसाद पुरोहित यांनाही याच प्रकरणात गोवण्यात आले. (Malegaon Bomb Blast)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community