Malaria : ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच मलेरियाने डोके वर काढले

सध्या दर दिवसाला मलेरियाचे 35 रुग्ण मुंबईत सापडत आहेत

201
Malaria : ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके वर काढले
Malaria : ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होताच गेस्ट्रॉऐवजी मलेरियाने डोके वर काढले

ऑगस्ट महिन्यात आठवडाभर पाऊस गायब आहे. या आठवड्याभरात साचलेल्या पाण्यातून मच्छरांमुळे होणाऱ्या आजार वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने दिली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात मलेरियाचे रुग्ण वाढल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. सध्या दर दिवसाला मलेरियाचे 35 रुग्ण मुंबईत सापडत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मलेरियाचे 226 रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. त्याखालोखाल गेस्ट्रॉचे 203 रुग्ण सापडले. डेंग्यूचेही 157 रुग्ण आढळून आले. तर संपूर्ण पंधरवड्यात मलेरियाचे 462 रुग्ण दिसून आले आहे.

मात्र लेप्टोचे 75 रुग्ण सापडल्याने पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डेंग्यू, लेप्टो आणि गेस्ट्रॉच्या रुग्णात वाढ दिसून आली होती. जुलै महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे जलजन्य आजारात वाढ झाली. गेस्ट्रॉचे जुलै महिन्यात 1 हजार 649 रुग्ण सापडल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली होती. मलेरियाचे 721, डेंग्यूचे 579, लेप्टोचे 377 तर हेपेटाइटिसच्या रुग्णांची संख्या 138 पर्यंत नोंदवली गेली. डेंग्यूचे 371 तर गेस्ट्रॉचे 429 रुग्ण आढळून आले.

(हेही वाचा – Raj Thackeray : छगन भुजबळ यांचा जेलमधील अनुभव ऐकून अजित पवार यांची भाजपमध्ये उडी – राज ठाकरे)

लेप्टोचे 151 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ऑगस्टच्या 1 ते 6 ऑगस्ट या आठवड्याच्या तुलनेत 7 ते 13 ऑगस्ट या दुसऱ्या आठवड्यामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचवेळी स्वाईन फ्लू, काविळ आणि चिकनगुनिया या रोगांचे अनुक्रमे 34, 9 आणि 2 रुग्ण दुसऱ्या आठवड्यामध्ये सापडले आहेत.

लेप्टोच्या रुग्णांची संख्या घटली

पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी तुंबण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जुलैमध्ये लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. जुलैमध्ये लेप्टोचे 413 रुग्ण सापडले होते. मात्र ऑगस्टच्या 13 दिवसांमध्ये हीच संख्या 151 वर आली आहे. त्यामुळे लेप्टोचा धोका कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

काय काळजी घ्याल
  • रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
  • साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
  • रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नका. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी पायाला जखम असल्यास बाहेर जाणे टाळा किंवा मलमपट्टी लावून बाहेर पडा.
  • घराबाहेर छप्परावर साचलेले पाणी स्वच्छ करा.
  • घरातील भांडी तसेच झाडाच्या कुंडयात साचलेले पाणी सतत बदलत रहा.
  • पाणी उकळून प्या.
  • तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.