पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दि. ३१ मार्च रोजी कोलकाता येथे ईदच्या नमाजला हजेरी लावली. यावेळी पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष, “राम आणि बाम” (भाजप आणि डावे पक्ष) दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बनर्जी (Mamata Banerjee)म्हणाल्या. तसेच भाजपावर जातीय दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच बनर्जी म्हणाल्या की, भाजपाचा (BJP) ‘घाणेरडा हिंदू धर्म’ हिंदुत्वाच्या खऱ्या तत्त्वांच्या विरोधात आहे. त्याचबरोबर सरकार राज्यातील जनतेसोबत उभे राहील आणि कोणीही राज्यात तणाव निर्माण करू शकणार नाही याची खात्री करेल, असेही बनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या.
(हेही वाचा : Share Investors : महाराष्ट्राचा ‘एनएसई’वर दबदबा; आयपीओ, गुंतवणूकदारांच्या संख्येत आघाडी)
पुढे बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाले, ‘राम आणि बाम’ एकत्र आले आहेत. लाल आणि भगवे आता एकत्र आले आहेत आणि राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतील. ते दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तुम्ही लोकांनी प्रतिक्रिया देऊ नये. त्यांच्या जाळ्यात अडकू नका.”, असेही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांची भाजपवर टीका
“मी श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांनी आचरण केलेल्या हिंदू (Hindu) धर्माचे धर्माचे पालन करते. मी भाजपाच्या घाणेरड्या हिंदू धर्माचे पालन करत नाही, असेही ममतादीदी (Mamata Banerjee) म्हणाल्या. तसेच बॅनर्जी यांनी भाजपा सरकारला ‘जुमलेबाज सरकार’ असेही म्हटले.
दरम्यान तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी पक्षाने केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “गेल्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे भाजपला रोखले.” धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दयावर भऱ देत ते म्हणाले, “चंद्राला कोणताही धर्म नसतो.” ते म्हणाले, “भारत हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि प्रत्येक व्यक्तीसाठी समान आहे.”
सनातन धर्म हा घाणेरडा धर्म आहे का?
ममता बॅनर्जी यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना, पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी म्हणाले, “तुम्ही कोणत्या धर्माला घाणेरडे म्हणत आहात? हा सनातन धर्म (Sanatan Dharma) आहे का? ईदच्या निमित्ताने तुम्ही असे भडकाऊ भाषण का दिले? हा धार्मिक समारंभ होता की राजकीय? तुम्ही घाणेरडे भाषण करण्याचा प्रयत्न करत आहात का? “, असा प्रश्नही अधिकारी यांनी विचारला.
भाजप नेते अमित मालवीय यांनीही अशाच प्रकारे म्हटले आहे की, “ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी सनातन धर्म हा घाणेरडा धर्म आहे का? त्यांच्या राजवटीत अनेक हिंदूविरोधी दंगली होऊनही, त्या हिंदूंची (Hindu) आणि त्यांच्या श्रद्धेची थट्टा करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत ईद साजरी करण्यासाठी बनवलेल्या व्यासपीठावरून वादग्रस्त विधान केले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community