बंगालमध्ये Waqf Amendment Act लागू करणार नाही; ममता बॅनर्जी यांची दर्पोक्ती

122

अल्पसंख्यांकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आम्ही पावले उचलू. मला ठाऊक आहे की, तुम्ही वक्फ सुधारणा कायद्याच्या (Waqf Amendment Act) अंमलबजावणीवर नाराज आहात. विश्वास ठेवा, बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही, ज्यामुळे समाजात फूट निर्माण करून कुणीही राज्य करू शकेल. बंगालमध्ये रहाणार्‍या लोकांना संरक्षण देणे, हे आमचे काम आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, जर कुणी तुम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यास चिथावणी देत असेल, तर कृपया तसे करू नका. मी तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल. जर आपण एकत्र राहिलो, तर आपण जग जिंकू शकतो, असे विधान पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केले आहे.

(हेही वाचा – मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Tahawwur Rana ला विशेष विमानाने भारतात आणणार; तिहार कि आर्थर रोड, सस्पेन्स कायम)

बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही, अशी भूमिका वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) नेत्यांनी मांडली आहे. बुधवार, ९ एप्रिल या दिवशी कोलकात्यामध्ये जैन समुदायातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला ममता बॅनर्जी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित होत्या. या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याची सरकार विरोधी भूमिका स्पष्ट केली आहे.

धर्मांधांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे आश्वासन

स्वतःच्या विरोधी भूमिकेचे समर्थन करतांना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “इतिहासात लिहिले आहे की, पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान (Pakistan) आणि भारत हे सगळे एकत्रच होते. फाळणी नंतर झाली. आता जे इथे राहात आहेत, त्यांना संरक्षण देणे हे आपलं काम आहे. जर लोक एकत्र राहिले, तर ते जग जिंकू शकतात. तुम्ही लक्षात ठेवा की, मी इथे आहे तोपर्यंत मी तुमचं आणि तुमच्या मालमत्तेचं रक्षण करेन”, असंही ममता बॅनर्जींनी यावेळी नमूद केले. (Waqf Amendment Act)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.