Traffic Jam मध्ये वाया जातात भारतियांचे अनेक मनुष्यतास; ‘ही’ ३ शहरे जगातील पहिल्या पाचात

60
Traffic Jam मध्ये वाया जातात भारतियांचे अनेक मनुष्यतास; 'ही' ३ शहरे जगातील पहिल्या पाचात
Traffic Jam मध्ये वाया जातात भारतियांचे अनेक मनुष्यतास; 'ही' ३ शहरे जगातील पहिल्या पाचात

शहरांमध्ये वाहन चालवणे आता सोपे राहिलेले नाही. तासनतास वाहतूक कोंडीत अडकणे आता सर्वच शहरांत रोजचे झालेले आहे. वाहतूक कोंडीचे (Traffic Jam) वास्तव सांगणारा टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्ट (TomTom Traffic Index Report, वाहतूक निर्देशांक अहवाल) जारी करण्यात आला आहे. अहवालातून जगातील आणि देशभरातील शहरातील वाहतूक कोंडीच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशांतील सर्वेक्षणाच्या आधारावर टॉमटॉम.कॉमने ट्रॅफिक इंडेक्स म्हणजेच वाहतूक निर्देशांक जारी केला आहे. २०२४ च्या अहवालानुसार जगातील आघाडीच्या पाच महत्त्वाच्या शहरात ३ भारतीय शहरांचा समावेश आहे. शिवाय कोलंबिया (Colombia) आणि ब्रिटनमधील (Britain) शहरांचा समावेश आहे. जागतिक वाहतूक निर्देशांकानुसार भारताचे तीन शहरे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांवर आहेत.

(हेही वाचा – Mahakumbh मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यावर कठोर कारवाई करा; हिंदु जनजागृती समितीची मागणी)

जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा मुकाबला करणारे तिसऱ्या क्रमांकांचे शहर बंगळूर (Bangalore), तर चौथ्या क्रमांकावर पुणे (Pune) आहे. भारतीय शहरांच्या निर्देशांकात या शहराचा क्रमांक अनुक्रमे दुसरा आणि तिसरा आहे. भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडी कोलकाता येथे आहे. वाहतूक कोंडीच्या बाबतीत भारतात पुणे तिसऱ्या स्थानावर असून जागतिक पातळीवर त्याचा चौथा क्रमांक लागतो. यंदा पुण्याची स्थिती गत वर्षीच्या तुलनेत अधिकच बिकट झाली आहे.

कोलकाता (Kolkata) आणि बंगळूरमधील प्रचंड वाहतूककोंडींने लोकांचे अनेक तास वाया घालविले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बंगळूरच्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनी गाडीतच किंवा बाईकवरच लॅपटॉप, मोबाईलच्या मदतीने बैठकीला हजेरी लावल्याचे किंवा कार्यालयातील महत्त्वाची कामे वाटेतच पूर्ण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र बंगळूरची स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी सुधारली आहे.

२०२४ मध्ये कोलकाता येथे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी ३३ तास ३४ सेकंद लागले आणि हा काळ गेल्या वर्षीच्या तुलनेत (२०२३) दहा सेकंदाने जास्त आहे. कोलकाता येथे २०२४ मध्ये नागरिकांनी सुमारे ११० तास वाहतूक कोंडीत घालविले. गेल्या वर्षी वाहतूक कोंडीचा स्तर ३२ टक्के होता. पाच ऑक्टोबर २०२४ चा दिवस बंगळूरवासियांसाठी सर्वांत तापदायक ठरला. त्या वेळी दहा किलोमीटरसाठी ३९ मिनिटे आणि २१ सेकंद लागले. वाहतूक कोंडीची (Traffic Jam) पातळी ५८ टक्के होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.