दिल्लीतील (Delhi) गोकुळपुरी (Gokulpuri) भागात एका हिंदू (Hindu) तरुणाची मुस्लिम मुलीशी लग्न केल्यामुळे हत्या करण्यात आली आहे. दि. ७ एप्रिल रोजी १९ वर्षीय हिमांशूची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. हिमांशूचा दोष होता की, त्याने एका मुस्लिम मुलीशी मैत्री केली आणि नंतर या दोघांचेही लग्न झाले. याचाच राग मुलीचा भाऊ शाहरुख (१९) आणि मोठा भाऊ साहिल (२२) यांनी हिमांशूची हत्या केली. ही घटना घडल्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबियांना अतिव वेदना झाल्या. कुटुंबातील सदस्यांनी रस्ता रोखून न्यायाची मागणी केली, ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.
( हेही वाचा : वक्फ विधेयकावरून Sanjay Nirupam यांचा शिवसेना उबाठावर घणाघात)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू (Himanshu) आणि शाहरुखची बहीण यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती. पण हे प्रकरण लग्नापर्यंत गेल्याने शाहरुख नाराज झाला. त्यामुळेच शाहरुख आणि मोठा भाऊ साहिल यांनी हिमांशूला (Himanshu) बाजूला हटवण्याचा निर्णय घेतला. दि. ७ एप्रिलला रात्री उशिरा संधी पाहून दोघांनीही हिमांशूवर चाकूने हल्ला केला आणि हिमांशूला (Himanshu) पळून जाण्याची एकही संधी दिली नाही.
घटनेची माहिती मिळताच गोकुळपुरीत (Gokulpuri) तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला आणि ते रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्ता रोखला आणि पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली. परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. (Himanshu)
पोलिसांनी तातडीने कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी भाऊ शाहरुख आणि साहिल (Sahil) यांना अटक केली. चौकशीदरम्यान असे उघड झाले की, शाहरुख (Shahrukh) हा हिमांशू आणि त्याच्या बहिणीशी झालेल्या लग्नामुळे संतप्त झाला होता. त्यामुळेच मोठा भाऊ साहिलसोबत (Sahil) मिळून त्याने हत्येचा कट रचला. हिमांशू (Himanshu) अल्पवयीन असताना त्याचे नाव काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले होते हे देखील उघड झाले. पण त्याच्या हत्येमागे कारण फक्त त्याचे लग्न होते. हिमांशूच्या (Himanshu) हत्येमुळे केवळ एक कुटुंबच उद्ध्वस्त झाले नाही तर संपूर्ण परिसरात भीती आणि तणाव पसरला. संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community