-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष पेंग्विन आरोग्य व्यवस्थापन प्रणालीची देखभाल करण्यासाठी एकही कंत्राटदार कंपनी पुढे येत नसून पुन्हा एकदा या पेंग्विन पिंजऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीवरच सोपवण्यात आली आहे. पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च देखभालीवर केला जाणार आहे. (Rani Baug)
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात १८ मार्च २०१७ पासून हंबोल्ट पेंग्विन कक्ष सुरू करण्यात आला. हे हंबोल्ट पेंग्विन पक्षी परदेशातून आयात करून प्रथमच भारतात आणले गेले. महापालिकेकडे हंबोल्ट पेंग्विन हाताळणी व व्यवस्थापन करण्याकरिता लागणारा तज्ञ कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने हंवोल्ट पेंग्विन व हंबोल्ट पेंग्विन कक्षाचे देखभाल आणि देखरेख तसेच आरोग्य व्यवस्थापन करण्याकरीता ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी यापूर्वी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी निवड करण्यात आली होती, या कंपनीचा कालावधी संपुष्टात आल्याने आता पुढील तीन वर्षांकरता नव्याने निविदा मागवली होती. परंतु या निविदेमध्ये पुन्हा एकदा एकमेव हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीनेच भाग घेतला आहे. या व्यतिरिक्त एकही कंपनी पुढे आली नाही. (Rani Baug)
(हेही वाचा – पानिपत पराभवाची नव्हे, मराठ्यांच्या शौर्याची लढाई; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
त्यामुळे महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीने एक टक्का कमी दर आकारुन बोली लावली असून या कंपनीची पुढील तीन वर्षांकरता निविड करण्यात आली आहे. या कंपनीला विविध करासंह २० कोटी ७७ लाख ६५ हजार एवढ्या रकमेचे कंत्राट देण्यात आले आहे. पेंग्विन कक्षाची उभारणी ही हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मार्फतच करण्यात आली होती. त्यामुळे या पेंग्विन कक्षाच्या व्यवस्थापनाचा अनुभव याच कंपनीकडे आहे. मात्र, याबाबतचा अनुभव अन्य कुठल्याही कंपनीकडे नसल्याने अन्य कुठली कंपनी यामध्ये भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे ही एकमेव कंपनीच या पेंग्विन कक्षाचे तसेच पेंग्विनच्या आरोग्य व्यवस्थापन प्रणालीची देखभाल व देखरेख करू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Rani Baug)
पेग्विन कक्षातील व्यवस्थापन राखण्याची काय असते जबाबदारी?
- वातानुकुलीत यंत्रणा (एचव्हीएससी सिस्टीम) – पेंग्विन मुख्य प्रदर्शनी कक्ष व विलगीकरण कक्ष
- विद्युत यंत्रणा – पेंग्विन मुख्य प्रदर्शनी कक्ष व विलगीकरण कक्ष
- जीव रक्षक प्रणाली (लाईफ सपोर्ट सिस्टीम) पेंग्विन मुख्य प्रदर्शनी कक्ष व विलगीकरण कक्ष
- पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community