आता ‘पितांबरी’ची उत्पादने होणार ओम प्रमाणित; Pitambari चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मोठी घोषणा

93
आता 'पितांबरी'ची उत्पादने होणार ओम प्रमाणित; Pitambari चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मोठी घोषणा
आता 'पितांबरी'ची उत्पादने होणार ओम प्रमाणित; Pitambari चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांची मोठी घोषणा

‘पितांबरी’चे (Pitambari) व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई (Ravindra Prabhudesai) यांनी दि. ३ एप्रिल या दिवशी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्या वेळी प्रभुदेसाई यांनी सावरकर स्मारकात चालणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच ओम प्रमाणपत्राची माहिती घेत, ‘पितांबरी’च्या उत्पादनांसाठी ओम प्रमाणपत्र  (Om certificate) घेतल्याची घोषणा त्यांनी केली.

( हेही वाचा : Purandar Trek : पुरंदर किल्ल्याचा ट्रेक किती अडचणीचा आहे? कोण चढाई करु शकतो?

‘पितांबरी’चे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई (Ravindra Prabhudesai) म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आल्याने पुन्हा एकदा सावरकारांच्या कार्याची उजळणी झाली. तसेच इथे येण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, ओम प्रमाणपत्राबद्दल अधिक माहिती मिळवणे. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. ‘पितांबरी’ची उत्पादने प्रामुख्याने पूजेसाठी, स्वयंपाक घरातील स्वच्छतेसाठी वापरली जातात. देश-विदेशात मोठ्या प्रमाणात अनेक जणांकडून ‘पितांबरी’ची उत्पादने विकत घेतली जातात.

‘पितांबरी’ला (Pitambari) हलाल प्रमाणपत्र (Halal certificate) घेण्यास वारंवार आग्रह केला जात होता. त्यामुळे विक्री वाढेल, असेही सांगण्यात येत होते. मात्र ३५ वर्षे बाजारात ‘पितांबरी’ आपले स्थान टिकवून आहे. अशा वेळी हलाल प्रमाणपत्र घेण्याची आम्हाला काहीही गरज नाही. आम्ही अरब, युके यांसारख्या २६ देशांत पितांबरीच्या उत्पादनांची निर्यात करतो. भारतीय हिंदूंकडून पितांबरीच्या उत्पादनांची मागणीही सर्वाधिक असते. त्यामुळे हलाल प्रमाणपत्र न घेताही इतर धर्मीय पितांबरीची उत्पादने वापरू शकतात. त्यामुळे आम्हाला हलाल उत्पादने घेण्याची गरज कधी वाटली नाही. मात्र ओम प्रमाणपत्राची माहिती घेऊन ‘ओम प्रमाणित’ (Om certificate) उत्पादने तयार करावीत, असे आम्हाला वाटले. त्यामुळेच हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) आणि हिंदूंच्या अर्थव्यवस्थेसाठी (Hindu Economy) ओम प्रमाणपत्र (Om certificate) घेऊन ते ‘पितांबरी’च्या उत्पादनांवर छापण्यास सुरुवात करणार आहोत. यामुळे अनेक हिंदू ग्राहक आनंदाने पितांबरीची उत्पादने विकत घेतील आणि विक्रीवृद्धी होईल, अशी आशाही प्रभुदेसाई (Ravindra Prabhudesai) यांनी व्यक्त केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.