मडगाव स्थानकाहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मांडवी एक्सप्रेसच्या (Mandvi Express) एका डब्याला आग (Fire) लागली. ही घटना सावंतवाडी रोड स्टेशनपासून अर्धा किमी. अंतरावर घडली. या घटनेमुळे प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली.
गाडीच्या डब्याला आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी गाडी सावंतवाडी स्थानकात थांबवून आगीवर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील पॅड जळाल्याचा वास आला. ब्रेकमधील काही तांत्रिक कारणांमुळे आग लागल्याची शक्यता कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Amrit Kalash Yatra : ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता)
मडगाव येथून मांडवी एक्सप्रेस मडुरे स्थानकात पोहोचली. तेथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सावंतवाडी स्थानक असताना जनरेटर कार, दिव्यांग आणि गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. त्यामुळे गाडी सावंतवाडी स्थानकात थांबवून डब्यातील कर्मचाऱ्यांनी स्थानकातील अधिकाऱ्यांना आगीची माहिती दिली. गाडीची चाके थंड झाल्यानंतर एका तासानंतर गाडीने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community