Mangal Prabhat Lodha : विद्यार्थी व लोकसहभागातून गड किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम

139
Mangal Prabhat Lodha : विद्यार्थी व लोकसहभागातून गड किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम
Mangal Prabhat Lodha : विद्यार्थी व लोकसहभागातून गड किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे येत्या १ ऑक्टोबरला नजिकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबरला राज्यातील गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री लोढा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास उपक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय.) यांच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी यांच्या सहभागातून १ ऑक्टोबरला परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबरला गड-किल्ले परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाशी (आयटीआय) संपर्क साधावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

(हेही वाचा – Ganpati : बाप्पाने ऐकले, पुढच्या वर्षी लवकर येणार…)

आपला परिसर आणि आपल्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गड किल्ले स्वच्छ आणि सुंदर ठेवले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षानिमित्त कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधील विद्यार्थ्यांद्वारे शिवरायांना एक अनोखी मानवंदनाही देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्रासाठी राज्यात १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाच्या या स्वच्छता विषयक उपक्रमांसाठी सर्वांनी सहभागी होऊन व हे अभियान यशस्वी करूया असेही आवाहन लोढा यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.