Mangal Prabhat Lodha : जोधपूरमध्ये उच्च न्यायालयातील वकील ते सध्याचे देशातले सगळ्यात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक, कसा आहे मंगलप्रभात लोढांचा प्रवास

भारतातील अब्जाधीशांच्या यादीत मंगलप्रभात लोढा आठव्या स्थानावर आहेत.

54
Mangal Prabhat Lodha : जोधपूरमध्ये उच्च न्यायालयातील वकील ते सध्याचे देशातले सगळ्यात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक, कसा आहे मंगलप्रभात लोढांचा प्रवास
Mangal Prabhat Lodha : जोधपूरमध्ये उच्च न्यायालयातील वकील ते सध्याचे देशातले सगळ्यात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक, कसा आहे मंगलप्रभात लोढांचा प्रवास
  • ऋजुता लुकतुके

मध्य आणि दक्षिण मुंबईत तुम्ही नजर गोल फिरवलीत तर एक नाव उंचावर झळकतं. ते म्हणजे लोढा बिल्डर्स. दक्षिण मुंबईत ट्रंप टॉवर आणि मध्य मुंबईतील सेंटर वन या गगनचुंबी इमारती मुंबईत कुठूनही दिसेल अशा उंच आहेत. या इमारतींना जितके मजले आहेत तितक्या पायऱ्या त्यांचा निर्माता मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आपल्या कारकीर्दीत चढला आहे. कारण, जोधपूरच्या एका न्यायाधीशाचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बीकॉम आणि पुढे वकील झाला. आणि जोधपूर उच्च न्यायालयात वकिलीही करू लागला. स्वातंत्र्यसैनिकाच्या या मुलाची स्वप्न मात्र मोठी होती. आणि त्यासाठी त्यांना मुंबई खुणावत होती. त्यामुळे ३१ व्या वर्षीच त्याने मुंबई गाठली. आणि इथे आल्या आल्या वर्षभरात स्वत:ची बांधकाम कंपनी सुरूही केली. सुरुवातीला मध्यमवर्गीय लोकांसाठी, मध्यम उत्पन्न गटातील घरं बनवता बनवता पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईत कॉर्पोरेट इमारती बांधण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास मागच्या ४६ वर्षांत झाला आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यात २९ हजार रोजगार निर्मिती होणार; १ लाख १७ हजार कोटीच्या गुंतवणुकीला मान्यता)

वडील स्वातंत्र्‍यसैनिक असल्यामुळे असेल कदाचित पण, राजकारणाकडेही ते सुरुवातीलाच ओढले गेले. आणि तिथेही मुंबई प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंतची मजल त्यांनी अल्पावधीतच मारली. सुरुवातीचा लोढा समुह आता व्यावसायिकदृष्ट्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स झाला आहे. १९९५ पासून मुंबईतील श्रीमंत अशा मलबार हिल मतदारसंघाचे ते आमदार आहेत. आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची असलेली पकड त्यांनी राजकारणातही दाखवून दिली आहे.

त्यांच्या दूरदृष्टीतूनच मुंबईत सागरी महामार्ग उभा राहिला आहे. मॅक्रोटेकचा विस्तार तर इतका झालाय की या घडीला मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) हे देशातील सगळ्यात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आहेत. आणि त्यांची एकूण मालमत्ता १,०६० कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे. लोढा यांची दोन्ही मुलं अभिषेक आणि अभिनंदन ही बांधकाम व्यावसायिकच आहेत. आणि समुहातील विविध कंपन्या सांभाळतात. संपूर्ण लोढा कुटुंबीयांची मिळून एकूण मालमत्ता आहे १,०३,८०० कोटी रुपये. २०२३ मध्ये देशातील ज्या १० अब्जाधीशांनी मिळून देशाच्या संपत्तीत १३.३९ लाख कोटी रुपयांची भर टाकली, त्यात मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. लोढा यांची संपत्ती मागच्या १० वर्षांत ५१,००० कोटी रुपयांनी वाढली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.