२ दिवसांत २२ कोटी मिळकतकर जमा करा अन्यथा…; महापालिकेची Mangeshkar Hospital ला नोटीस

79
२ दिवसांत २२ कोटी मिळकतकर जमा करा अन्यथा...; महापालिकेची Mangeshkar Hospital ला नोटीस
२ दिवसांत २२ कोटी मिळकतकर जमा करा अन्यथा...; महापालिकेची Mangeshkar Hospital ला नोटीस

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे (Mangeshkar Hospital) मिळकतकराचे २२ कोटी रुपये थकित आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) या रुग्णालयाला जप्तीची नोटीस पाठविली आहे. त्यात मिळकत कराचे २२ कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने नोटीशीद्वारे दिला आहे.

( हेही वाचा : भुलाभाई देसाई मार्गावरील Robotic Parking च्या देखभालीवरच महिन्याला १५ लाखांचा खर्च
­­­­­­­
काही दिवसांपूर्वी दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात (Mangeshkar Hospital) उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे (Tanisha Bhise) या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे २७ कोटीची मिळकत कर थकविला आहे, अशी माहिती समोर आली आहे. महापालिकेने (Pune Municipal Corporation) मिळकत कर वसुल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (Rohan Suravase Patil) यांनी दिला होता.

त्यानंतर आता पुणे महापालिका प्रशासनाने मंगेशकर रुग्णालयाला दणका दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास महापालिकेने नोटीस पाठवली आहे. मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी असे तोंडी आदेश देण्यात आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला नोटीस बजावली आहे.

एरंडवणा येथील मंगेशकर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या (Lata Mangeshkar Medical Foundation) मालकीचे आहे. या मिळकतीवर २०२४ २५ या आर्थिक वर्षाअखेर सुमारे २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ इतका मिळकत कर थकबाकी आहे. या मिळकतीवर आकारण्यात आलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाऊंडेशनने २०१६-१७ साली महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. या दाव्यात फाऊंडेशनने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या पन्नास टक्के रक्कम आणि इतर कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २०१४ ते २०२५ अखेर फाउंडेशनकडे एकुण २२ कोटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.