Mangrove forest : राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ

70
Mangrove forest : राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ
Mangrove forest : राज्यात 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनांमध्ये वाढ

महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षात कांदळवन (Mangrove forest) क्षेत्रात 1 हजार 239 हेक्टरने वाढ झाल्याची माहिती राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी येथे दिली. ऐरोली (Airoli) सेक्टर 10 येथील जैवविविधता केंद्र जेट्टी ते बेलापूर येथील जेट्टी असा पाहणी दौरा वने मंत्री गणेश नाईक यांनी खाडीमार्गे केला. रामाराव, श्रीमती सावंत, श्रीमती पवार, गजभिये, बहादुरे हे कांदळवन विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता अरदवाड आणि युडीडीपी केकाण हे अधिकारी या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते. (Mangrove forest)

हेही वाचा-West Bengal: जादवपूर विद्यापीठात राडा! एसएफआय विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्र्यांसह अनेक प्राध्यापकांना ओलीस धरले

राज्य शासनाने दिलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हा पाहणी दौरा एक भाग होता. जैवविविधता केंद्राला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या ठिकाणी पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांना पोषक असे वातावरण कायम ठेवण्याचा वन विभागाचा प्रयत्न असतो. पूर्वी काही हजारांमध्ये असलेल्या फ्लेमिंगोची संख्या आज दीड लाखाच्या घरात गेली आहे. समुद्राच्या पाण्यावर दिसणारे प्लास्टिक, तेलाचा तवंग, प्रक्रिया न करता सोडण्यात आलेले पाणी स्वच्छ करण्यासाठी उपाय योजना करण्याची सूचना नामदार नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना केली. त्याचबरोबर या विषयाशी संबंधित उद्योग, पर्यावरण, बंदरे या विभागांबरोबर यानुषंगाने चर्चा करण्याचे निर्देशदेखील दिले. (Mangrove forest)

हेही वाचा-Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

राज्यात मागील दोन वर्षांमध्ये 1 हजार 239 हेक्टरने कांदळवनाच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. खारफुटी पुनर्रोपणासारखे कार्यक्रम वनविभाग राबवित आहे. कोस्ट गार्ड तर्फे खाडी किनारी अतिशय आधुनिक उपकरणांसह नियमित गस्त सुरू असते. कांदळवनांचे (Mangrove forest) नुकसान होत नाही ना याकडे बारीक लक्ष ठेवले जाते. त्यामुळे खाडीतील कांदळवने (Mangrove forest) सुरक्षित आहेत. ज्या ठिकाणी कांदळवनांवर अतिक्रमण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी सुरुवातीला संबंधित घटकांना समजावून सांगण्यात येईल. त्यानंतरही अतिक्रमणे हटवली नाहीत तर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले. प्रवासी आणि मच्छिमारांसाठी दिवाजेट्टी 24 तास वापरण्यायोग्य करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. (Mangrove forest)

हेही वाचा-Management Consultant Salary : मॅनेजमेंट कन्सल्टंटना भरगच्च पगार का मिळतो? असं काय करतात जे आपण करु शकत नाही?

ऐरोली मध्ये जैवविविधता केंद्र येथे वनविभागाच्या वतीने खारफुटी वूड वॉकची निर्मिती केली जाणार आहे. गोराई येथे अशा प्रकारचा वूड वॉक अगोदरच तयार करण्यात आलेला आहे. लाकडाच्या पुलावरून चालत खारफुटी पर्यटनाचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. प्लास्टिक मुक्त शहर, प्रदूषणमुक्त वने आणि समुद्र यासाठी जन सहभाग आणि जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. (Mangrove forest)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.