Manhols : मुंबईतील ५० टक्के मॅनहोल्स अद्यापही असुरक्षितच? ३१ मे पर्यंत मॅनहोल्सच्या जाळ्या बसवण्याचे लक्ष्य कसे गाठणार महापालिका

351
Manhols : मुंबईतील ५० टक्के मॅनहोल्स अद्यापही असुरक्षितच? ३१ मे पर्यंत मॅनहोल्सच्या जाळ्या बसवण्याचे लक्ष्य कसे गाठणार महापालिका
Manhols : मुंबईतील ५० टक्के मॅनहोल्स अद्यापही असुरक्षितच? ३१ मे पर्यंत मॅनहोल्सच्या जाळ्या बसवण्याचे लक्ष्य कसे गाठणार महापालिका
  • सचिन धानजी, मुंबई

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने रस्त्यांवरील गटारांचे प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सवर (Manhols) जाळ्या बसवण्याचा कृती आराखडा तयार करून सर्व विभागांच्यावतीने याची अंमलबजावणी सुरु झाली. परंतु पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापही निम्या मॅनहोल्सवर (Manhols) जाळ्या बसवता आलेल्या नाहीत. त्यामुळे ३१ मे पर्यंत या जाळ्या कशा बसवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Manhols)

(हेही वाचा- ST New Online Reservation: एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, कारण काय?)

ऑगस्ट २०१७ मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जागी पाणी साचले गेले होते. त्यामुळे अनेकांना या पुराच्या पाण्यातून चालत जावे लागले. रस्त्यावर तुंबलेल्या या पाण्यातून जात असताना एलफिन्स्टन येथील सेनापती बापट मार्ग आणि मडुरकर मार्गाच्या जंक्शनवर उघडया असलेल्या मॅनहोलचा (Manhols) अंदाज न आल्याने त्यात डॉ दीपक अमरापूरकर (Dr. Deepak Amarapurkar) यांचा पडून मृत्यू झाला होता.  या घटनेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) महापालिकेला मुंबईतील रस्त्यांखालून जाणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी तसेच मलनि:सारण वाहिनी यांच्या मॅनहोल्सवर (Manhols) संरक्षक जाळ्या बसवण्याचे निर्देश दिले होते. मुंबईतील मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) उपाययोजना आखाव्‍यात, असे आदेश उच्‍च न्‍यायालयाने दिले होते. त्‍यानुसार, मागील वर्षी म्हणजे  २०२३ मध्ये तत्कालिन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी प्रशासनाला मॅनहोल (Manhols) सर्वेक्षणासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. मॅनहोल्स आणि चेंबर्सच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश तत्कालिन आयुक्त चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिले होते. त्यानुसार जून २०२३ मध्ये तत्कालिन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसाळयातील दुर्घटना टाळण्‍यासाठी मुंबई महानगरातील (BMC) सर्व मॅनहोल्‍सना (Manhols) संरक्षक जाळ्या बसविण्‍यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्‍यात येईल. यासाठी महानगरपालिकेचे अभियंते येत्‍या पंधरा दिवसात स्‍वतंत्र प्रतिकृती (प्रोटोटाईप) विकसित करतील. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्‍यानंतर मुंबईतील मॅनहोलवर जाळी बसविण्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात येईल. माननीय उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार मॅनहोल (Manhols) सुरक्षित केले जाईल, असे त्यांनी जाहिर केले होते. (Manhols)

(हेही वाचा- Dombivli MIDC Blast : सोन्याच्या अंगठीमुळे डोंबिवली स्फोटातील मृत महिलेची ओळख पटली )

परंतु आता मान्सून तोंडावर आला तरी महापालिकेला मॅनहोल्सवर (Manhols) जाळ्या बसवण्याचे लक्ष्य काही गाठता आलेले नाही. मुंबईतील पर्जन्य जलवाहिनी आणि मलनि:सारण वाहिन्यांवरील मॅनहोल्सवर सुमारे ९४ हजार संरक्षक जाळ्या बसवणे आवश्यक आहे. मात्र, त्यातील  २४ मे २०२४ पर्यंत केवळ ४३, ५८१ संरक्षक जाळ्याच मॅनहोल्सवर बसवल्याची माहिती मिळत आहे. मॅनहोल्सच्या (Manhols) जाळ्या पावसाळ्यापूर्वी बसवणे आवश्यक असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Dr Ashwini Joshi) यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली होती आणि त्यात त्यांनी सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील संरक्षक जाळ्या ३१ मे पूर्वी बसवल्या जातील याप्रमाणे युध्दपातळीवर कामे करा असे निर्देश दिले होते. तरीही अद्याप ५० टक्केही जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांना सुधारीत परिपत्रक जारी करून विहित वेळेत या जाळ्या बसवण्याची कार्यवाही करावी असे कळवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. (Manhols)

मात्र, काही विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या संरक्षक जाळ्या संबंधित खात्याच्या माध्यमातून खरेदी करून विभाग कार्यालयांना उपलब्ध करून दिल्या जायच्या. परंतु यंदा यासर्व जाळ्यांची खरेदी ही मध्यवर्ती खात्यामार्फत न करता सर्व विभाग कार्यालयांच्यावतीने करण्यात आली. विशेष म्हणजे मागील पावसाळ्यात याचा कृती आराखडा तयार करून सर्व प्रकारचे निर्णय घेतल्यानंतर या जाळ्यांच्या खरेदीची प्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राबवली गेली.त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची उपलब्धता याला बराच विलंब होत आहे, परिणामी  पावसाळ्यापूर्वी हे लक्ष्य गाठता आलेले नाही. (Manhols)

(हेही वाचा- Maharashtra Weather: राज्यासह देशात ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहणार? IMD चा अंदाज काय सांगतो?)

मुंबईतील २४ विभाग कार्यालयांपैंकी ७ विभागांमध्ये  जाळ्या बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ १७ विभाग कार्यालयांमध्येच शिल्लक जाळ्या बसवण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे ज्यांची निविदा प्रक्रिया आधी झाली त्यांना जाळ्या उपलब्ध झाल्या म्हणून ते बसवून मोकळे झालेत, पण ज्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात सर्व प्रकारची मंजुरी मिळाली, त्यांना जाळ्या कधी मिळणार आणि ते कधी बसवणार असा प्रश्नच त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे याची निविदा जर मागील वर्षीच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात झाली असती तर एव्हाना सर्व मॅनहोल्सवरील जाळया बसवून झाल्या असत्या,असेही बोलले जात आहे. (Manhols)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.