ईशान्यकडील राज्य असलेल्या मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी पुन्हा राज्यात हिंसाचार झाला, त्यामुळे अखेर मणिपूर राज्याला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तणावाची परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. अलीकडेच सरकारने राज्यात हिंसाचाराच्या घटना कमी झाल्यामुळे २३ सप्टेंबर रोजी राज्यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. मात्र आता पुन्हा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
मणिपूर (Manipur) सरकारने अधिसूचनेत म्हटले की, १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रभावी १० पोलीस ठाणी वगळता मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. राज्यात विविध अतिरेकी गटांच्या हिंसक कारवायांमुळे राज्यात सशस्त्र दलांची गरज असल्याचे राज्यपालांचे मत आहे. यात राजधानी इम्फाल, लॅम्फेल, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामासांग, पटसोई, वांगोई, पोरोम्पट, हिंगांग, लमलाई, इरिलबुंग, लिमाखोंग, थौबल, बिष्णुपूर, नंबोल, मोइरांग, काकचिंग आणि जिरीबाम या राज्यांचा समावेश आहे. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मणिपूरमधील (Manipur) परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे.
(हेही वाचा BJP : दोन दिवसांत भाजप राजस्थान विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी करणार जाहीर)
Join Our WhatsApp Community