Manipur Riot : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी विशेष विमान पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. दरम्यान या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.

181
Manipur Riot : मराठी विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी विशेष विमान पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे दंगली (Manipur Riot) सुरु आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मणिपूर मधील महाराष्ट्राच्या विद्यर्थ्यांना राज्य सरकारने मदत करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी हे तेथील NIT येथे शिकण्यासाठी जातात. सध्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी तिथे राहणे योग्य नाही. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवार ७ मे रोजी त्यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला.

(हेही वाचा – Manipur Riot : मणिपूर पेटले; ५४ जणांचा मृत्यू; १० हजार जवान तैनात)

दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

न्यायालयाच्या निर्णयाचे मणिपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या ठिकाणी जाती समुदायात दंगल (Manipur Riot) उसळली आहे. येथील परिस्थिती संवेदनशील आहे. या ठिकाणी उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. दरम्यान या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.

हिंसाचार का उफाळला?

मणिपूरमधील (Manipur Riot) आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजातील झालेल्या वादातून हा हिंसाचार उफाळला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑल ट्रायबल स्टूडंट यूनियन मणिपूर (ATSUM) या एका ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान या हिंसाचार झाला आहे.

आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात का वाद?

मणिपूरमध्ये (Manipur Riot) तीन प्रमुख समाज आहे. पहिला मैतेई, दुसरा नागा आणि तिसरा कुकी. नागा आणि कुकी आदिवासी समाज आहे, तर मैतेई हा बिगर आदिवासी समाज आहे. पण आता मैतेई समाजातील लोकांनी इच्छा आहे की, त्यांना देखील अनुसूचित जनजाति किंवा आदिवासी समाजाचा दर्जा मिळावा. पण नागा आणि कुकी समाज याला तीव्र विरोध करत आहेत. (Manipur Riot)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.