गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे दंगली (Manipur Riot) सुरु आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मणिपूर मधील महाराष्ट्राच्या विद्यर्थ्यांना राज्य सरकारने मदत करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थी हे तेथील NIT येथे शिकण्यासाठी जातात. सध्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी तिथे राहणे योग्य नाही. याच पार्श्वभूमीवर तेथील काही विद्यार्थ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलिस महासंचालक यांना संपर्क केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील मणिपूर (Manipur Riot) सरकारशी संपर्क साधत परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र प्रशासन सातत्याने तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहे.
(हेही वाचा – Manipur Riot : मणिपूर पेटले; ५४ जणांचा मृत्यू; १० हजार जवान तैनात)
दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू
न्यायालयाच्या निर्णयाचे मणिपूरमध्ये तीव्र पडसाद उमटले असून या ठिकाणी जाती समुदायात दंगल (Manipur Riot) उसळली आहे. येथील परिस्थिती संवेदनशील आहे. या ठिकाणी उसळलेल्या दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. दरम्यान या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.
हिंसाचार का उफाळला?
मणिपूरमधील (Manipur Riot) आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजातील झालेल्या वादातून हा हिंसाचार उफाळला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑल ट्रायबल स्टूडंट यूनियन मणिपूर (ATSUM) या एका ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान या हिंसाचार झाला आहे.
हेही पहा –
आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात का वाद?
मणिपूरमध्ये (Manipur Riot) तीन प्रमुख समाज आहे. पहिला मैतेई, दुसरा नागा आणि तिसरा कुकी. नागा आणि कुकी आदिवासी समाज आहे, तर मैतेई हा बिगर आदिवासी समाज आहे. पण आता मैतेई समाजातील लोकांनी इच्छा आहे की, त्यांना देखील अनुसूचित जनजाति किंवा आदिवासी समाजाचा दर्जा मिळावा. पण नागा आणि कुकी समाज याला तीव्र विरोध करत आहेत. (Manipur Riot)
Join Our WhatsApp Community