गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये Manipur Violence सुरू असलेला हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या २४ तासांत मणिपूरमधील तणावग्रस्त भागात पिता-पुत्रासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळपासून बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमा भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या भागात झालेल्या हिंसाचारात १६ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात लष्कराला पाचारण करण्यात आलं असून लष्करी जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. बंदुकीची गोळी लागून जखमी झालेल्या एका बंडखोराला लष्कराने ताब्यात घेतलं आहे.
या भागात शनिवारी सायंकाळी झालेल्या हत्यांपैकी दोन जणांना खूप जवळून गोळ्या घातल्या आहेत. तसेच त्यांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी ६ ऑगस्ट रोजी इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता दिली जाणार नसल्याचं सांगितंले जात आहे. बिष्णुपूर-चुराचांदपूर सीमेवर शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी मोर्टार आणि ग्रेनेड हल्ले झाले. तसेच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. गेल्या दोन आठवड्यांपैकी कालच्या दिवशी इम्फाळसह बिष्णुपूर-चुराचांदपूरमधली परिस्थिती खूप नाजूक होती.
(हेही वाचा PM Narendra Modi : मागील ७० वर्षांत एकही युद्धस्मारक बांधले नाही – पंतप्रधानांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community