मणिपूरमध्ये 23 सप्टेंबर रोजी मोबाईल इंटरनेटवरील बंदी उठल्यानंतर २ विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची छायाचित्रे समोर आली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Manipur Violence) फोटोमध्ये दोघांचेही मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. तसेच मुलाचे डोके कापण्यात आले आहे. मात्र, अद्याप दोघांचेही मृतदेह सापडलेले नाहीत. जुलै महिन्यात एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही विद्यार्थी दिसले होते, मात्र तेव्हापासून त्यांचा शोध लागला नव्हता. आता त्यांचे मृतदेह समोर आले आहेत. (Manipur Violence)
(हेही वाचा – Central Railway : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वे वर १० विशेष लोकल)
या विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआय 27 सप्टेंबरला इंफाळला जाणार आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार याप्रकरणी एकत्र काम करत आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. मंगळवारी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी इंफाळ शहरात सुरक्षा दल आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 1 शिक्षकासह 54 विद्यार्थी जखमी झाले. जुलै महिन्यापासून बेपत्ता झालेल्या 2 विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात विद्यार्थी आंदोलन करत होते. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा पुढील 5 दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट बंद केले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने 27 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी सर्व सरकारी आणि निमसरकारी शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. (Manipur Violence)
सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे
जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीमही सुरू केली आहे. लोकांनी संयम बाळगावा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमधील फॉरेन रिलेशन्स कौन्सिलमध्ये चर्चेदरम्यान सांगितले की, मणिपूरमधील समस्येचा एक भाग म्हणजे तेथे आलेल्या स्थलांतरितांचा अस्थिर परिणाम आहे. येथे तणावाचा मोठा इतिहास आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून परिस्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Manipur Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community