ईशान्येकडील मणिपूर (Manipur Violence) राज्यात दोन जातीय गटांमधील वाद अजूनही सुरूच आहे. राज्यात मागील चार महिन्यांपासून हिंसाचार सुरूच आहे. मात्र अजूनही तिथे तणावपूर्ण वातावरण कायम आहे.
मणिपूरमध्ये (Manipur Violence) पुन्हा एकदा गोळीबार झाला असून यामध्ये दोन जण ठार झाली आहेत तर ७ जण जखमी झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, विष्णूपर-चुराचांदपूरच्या सीमेवर आणि अन्य एका ठिकाणी झालेल्या गोळीबारात ग्रामरक्षक दलाच्या दोन स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. तसेच सात जण जखमी झाले. चुराचांदजवळील नारासेईना येथे हल्लेखोरांनी शेतात काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल ग्रामरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी गोळीबार केला.
(हेही वाचा – I.N.D.I.A. vs Mahayuti : मुंबईत बैठकांचं सत्र; इंडिया आघाडी आणि महायुतीची एकाच दिवशी बैठक)
नारासेईना या गावावर काल (बुधवार ३० ऑगस्ट) सकाळी साडे सहाच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर रात्रीपर्यंत हिंसाचार (Manipur Violence) सुरूच होता. दिवसा गोळीबार झाल्याचे समजल्यानंतर संवेदनशील भागात केंद्रीय सुरक्षा दलाने आणि लष्कराने तपासणी मोहीम राबविली असून चुराचांदपूरच्या हल्ल्यात सामील असलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
हजारो जणांचे स्थलांतर
या हिंसाचाराच्या (Manipur Violence) पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये ६५ हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. मे महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे नागरिक घर सोडून गेले आहेत. हिंसाचारात १६५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ६ हजार जण जखमी झाले आहेत. आगीच्या पाच हजार घटना घडल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community