Manipur Violence : जातीय हिंसाचार नव्हे, हे तर म्यानमारचे भारताविरुद्धचे युद्ध; एनआयएचे मोठे खुलासे

मणिपूर हिंसाचाराचा कट कोणी रचला, मणिपूरमध्ये हिंसाचार कोण पसरवत आहे, हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले आहे.

192
Manipur Violence : जातीय हिंसाचार नव्हे, हे तर म्यानमारचे भारताविरुद्धचे युद्ध; एनआयएचे मोठे खुलासे
Manipur Violence : जातीय हिंसाचार नव्हे, हे तर म्यानमारचे भारताविरुद्धचे युद्ध; एनआयएचे मोठे खुलासे

गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत  राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) मोठा खुलासा केला आहे. (Manipur Violence) मणिपूरमधील हल्ल्यांमागे आणि जातीय हिंसाचार भडकावण्यामागे म्यानमारच्या काही प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. मणिपूरमधील सुरक्षा दल आणि स्थानिकांवर हल्ले करण्यासाठी या संघटना कार्यकर्त्यांची भरती करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. (Manipur Violence)

(हेही वाचा – Pune Crime Branch : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून २ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

म्यानमार आणि बांगलादेशमधील आतंकवाद्यांनी भारतियांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या उद्देशाने हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात अतिरेकी नेत्यांच्या गटाची भरती केल्याचे समोर आले आहे. बाहेरचे आतंकवादी आणि त्यांना साथ देणारे यांचा एकत्रित कट आहे. म्यानमार आणि बांगलादेशातील अतिरेकी गट मणिपूरला कोणत्याही परिस्थितीत शांत होऊ देऊ इच्छित नाहीत. एनआयएने चुरचंदपूर येथून एका संशयिताला अटक केली आहे. तो परदेशातून भारताविरुद्ध रचल्या जात असलेल्या दहशतवादी कटाचा भाग आहे.  (Manipur Violence)

म्यानमार आणि बांगलादेशमधून शस्त्रपुरवठा

म्यानमार आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटनांचे हस्तक मणिपूरमध्ये शस्त्रे, दारूगोळा आणि इतर दहशतवादी उपकरणे खरेदीसाठी निधी पुरवत आहेत. त्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा सीमेपलीकडून, तसेच भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवाद्यांना केला जातो. विदेशी संस्थांकडूनही मदत मिळत आहे. इतकेच नाही तर मणिपूरमध्ये म्यानमारच्या दहशतवादी संघटनांचे अनेक दहशतवादी सक्रिय आहेत, जे जमावात घुसून मणिपूरच्या लोकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात, त्यामुळे हिंसाचाराला चिथावणी मिळते आणि अराजकता वाढते. त्यांच्या गोळीबाराचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

मणिपूरमध्ये ४ महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. कुकी आतंकवादी आणि स्थानिक मैतेयी यांच्यात झालेल्या संघर्षात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे जळून खाक झाली आहेत. हजारो स्थानिकांना पलायन करावे लागले आहे. हजारो लोक आपला जीव वाचवण्यासाठी शेकडो निर्वासित छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. इंटरनेट सेवा बंद आहे. मणिपूरमध्ये अनेक महिने चालू  असलेल्या हिंसाचाराबाबत एनआयएने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

म्यानमारस्थित दहशतवादी संघटना बेकायदेशीरपणे शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके गोळा करतात. मणिपूरमधील शस्त्रांची लूट हाही त्याचाच एक भाग आहे. भारताची म्यानमारच्या लगत 1643 किलोमीटरची सीमा आहे. भारतात, म्यानमारची सीमा मीझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशशी आहे. भारत आणि म्यानमारच्या सीमेला अनेक किलोमीटरपर्यंत कुंपण नाही. या देशांतील लोक एकमेकांच्या हद्दीत सहज येऊ शकतात. यासोबतच 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या मुक्त दळणवळणामुळे म्यानमारच्या अतिरेक्यांना मणिपूरमध्ये प्रवेश करण्याचा सोपा मार्गही निर्माण झाला आहे. मुक्त व्यवहाराअंतर्गत, भारताच्या ४ राज्यांमध्ये राहणाऱ्या अनेक जमाती म्यानमारमध्ये 16 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही व्हिसाची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे म्यानमारमधील लोकही १६ किलोमीटरपर्यंत भारतात येऊ शकतात.

या सुविधेअंतर्गत अनेक अतिरेकी संघटना आणि दहशतवादी निर्वासित म्हणून भारतात प्रवेश घेत आहेत. या लोकांची शारीरिक रचना आणि भाषा स्थानिक लोकांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे त्यांची वेगळी ओळख पटत नाही. केंद्रीय गृहमंत्रालयालाही घुसखोरांच्या समस्येची जाणीव आहे. म्यानमारची मणिपूरशी ३९८ किमीची सीमा आहे. मणिपूरमधील टेंगनौपाल, चंदेल, उखरुल, कमजोंग आणि चुराचंदपूर जिल्हे या सीमावर्ती भागाशी जोडलेले आहेत. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.