नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (Manipur Violence) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. थौबल जिल्ह्यातील लिलोंग भागात सोमवारी (१ जानेवारी) संध्याकाळी स्थानिकांशी झालेल्या चकमकीनंतर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. हिंसाचारानंतर थौबल आणि इम्फाळ पश्चिमसह खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अंदाधुंद गोळीबारात तीन जणांचा मृत्यू –
अज्ञात हल्लेखोरांनी गर्दीवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही.
(हेही वाचा – Truck drivers strike: राज्यात ट्रक चालकांचा ३ दिवसीय संप, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई)
स्थानिकांनी पेटवल्या गाड्या –
हल्ल्यानंतर स्थानिकांनी धुमाकूळ घातला आणि तीन गाड्या पेटवल्या, असे पोलिसांनी सांगितले. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी थौबल, इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णुपूर जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Goldy Brar : सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार केंद्राकडून दहशतवादी म्हणून घोषित)
हल्लेखोरांनी आत्मसमर्पण करावे – मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी लिलॉंगच्या रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचाराचा निषेध करताना ते म्हणाले की, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल. त्यांनी हल्लेखोरांना आत्मसमर्पण करण्याचा किंवा परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा देखील दिला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीची केंद्रीय नेत्यांना माहिती देण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच दिल्लीला भेट देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community