Manipur Violence: चुराचांदपूरमध्ये हिंसाचार; एक ठार, अनेक जखमी

148
Manipur Violence: चुराचांदपूरमध्ये हिंसाचार; एक ठार, अनेक जखमी
Manipur Violence: चुराचांदपूरमध्ये हिंसाचार; एक ठार, अनेक जखमी

Manipur Violence : मणिपूरच्या चुराचांदपूर (Churachandpur) जिल्ह्यात ‘हमार’ आणि ‘झोमी’ समुदायांमध्ये पुन्हा (Hamar and Zomi community dispute) हिंसाचार उफाळला आहे. बुधवारी झालेल्या हिंसाचारात 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. लालरोपुई पाखुमाते असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हमार समुदायाच्या सदस्यांनी 18 मार्च रोजी झोमी गटाच्या समुदायाचा ध्वज फडकवण्यास विरोध केल्यानंतर हा हिंसाचार उसळला. येथील दोन्ही समुदायांच्या प्रमुख संघटनांमध्ये शांतता करार झाला असताना मंगळवारी रात्री उशिरा चुराचांदपूर शहरात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. (Manipur Violence)

(हेही वाचा – Nagpur Violence : हिंसाचार भडकवण्यासाठी बांगलादेशमधून चिथावणी; पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क)

बंद मागे घेण्याचे आवाहन
‘हमार इनपुई’ आणि ‘झोमी कौन्सिल’ यांनी मंगळवारी ‘बंद’ मागे घेण्याचा आणि जिल्ह्यातील सामान्य जीवन विस्कळीत करणाऱ्या सर्व घटनांचा अंत करण्यासंदर्भात करार केला होता. ‘हमार इनपुई’चे सरचिटणीस रिचर्ड हमार यांच्यावर रविवारी ‘झोमी’ समुदायाच्या सदस्यांनी हल्ला केला, ज्यामुळे दोन्ही समुदायांमध्ये हिंसाचार झाला आणि दुसऱ्या दिवशी कर्फ्यू लागू करण्यात आला.

सुरक्षा दलांनी शहरात काढला ‘फ्लॅग मार्च’
‘झोमी’ आणि ‘हमार’ समुदायांमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याने सुरक्षा दलांनी शहरात ‘फ्लॅग मार्च’ (Flag March) काढला आणि लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. या घटनेला प्रतिसाद म्हणून, झोमी विद्यार्थी संघटनेने जिल्ह्यात ‘बंद’ची हाक दिली.

(हेही वाचा – महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळावीत; आमदार Chitra Wagh यांची विधान परिषदेत मागणी)

जिल्हा प्रशासनाने सहकार्याचे आवाहन
अधिकाऱ्याने सांगितले की, लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावाने दगडफेक सुरू केली, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि हवेत गोळीबार करावा लागला. जिल्हा प्रशासनाने सहकार्य आवाहन केले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.