छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातृभूमीला आपल्या आयुष्यात प्रथम मानले. आपल्यासारख्या तरुणांना इथे मावळे संबोधण्यात आले आहे. त्यामुळे मावळ्यांनी ‘राष्ट्रप्रथम’ ही भावना मनात रुजवायला हवी. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागले नाही, मात्र ते स्वातंत्र्य टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. दिवाळीत गडदुर्ग साकरणे हे चांगलेच, पण गडदुर्गांवर तरुणांनी भ्रमंती करणे गरजेचे आहे, असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
( हेही वाचा : हिंदू देवतांबद्दल घृणास्पद विधान करणाऱ्या मौलाना रशिदीवर गुन्हा दाखल करा; Aniket Shastri Maharaj यांची राज्य सरकारकडे मागणी)
गड दुर्गांच्या स्वच्छेतेसाठी मोहीम करावी लागणे, हे आपले दुर्दैव; – मंजिरी मराठे
मंजिरी मराठे म्हणाल्या की, आज अनेकजण स्वच्छतेसाठी गडावर (Fort) जातात. मात्र गडकोटावर स्वच्छतेसाठी नाही तर इतिहासाची माहिती मिळवण्यासाठी प्रदीर्घ इतिहासाची अनुभूती घेण्यासाठी, स्फूर्ती घेण्यासाठी आपण जायला हवे. आज गड दुर्गांच्या (Fort) स्वच्छतेसाठी मोहीम करावी लागणे, हे आपले दुर्दैव आहे. गडदुर्गांचे रक्षण करणे, देशाचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या मुलांना आपण शस्त्रास्त्र शिकवायला हवीत, असे विधान स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी केले.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीच्या वतीने दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पराक्रमी वीरांच्या शौर्याचे प्रतीक असणारे गड दुर्ग साकारणाऱ्या मावळ्यांचा सन्मान करण्यासाठी ‘जागर गडदुर्गांचा, दीप दुर्गोत्सव सोहळा २०२४’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडदुर्ग साकारणाऱ्या तरुण मावळ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब (Appa Parab), स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar), स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी मान्यवर उपस्थित होते. (Fort)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community