मानखुर्दमधील (Mankhurd) कुर्ला (Kurla) स्क्रँप गोडाऊला दि. २३ डिसेंबर रोजी भीषण आग लागली आहे. हे भंगार गोडाऊन मानखुर्द घाटकोपर लिंक रोड जवळ आहे. मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग का लागली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सिलेंडरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Mankhurd)
( हेही वाचा : महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न; पंतप्रधान Narendra Modi यांचे विधान)
मानखुर्दमधील (Mankhurd)आग विद्युत वायरिंग, लाकडी भंगार साहित्य, स्क्रॅप मटेरियलसह विविध प्लास्टिक सामग्री इत्यादींपर्यंत मर्यादित आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या (fire brigade) गाड्या तात्काळ घटना स्थळी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या परिसरात आगीचे लोट उठताना दिसत आहेत. (Mankhurd)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community