मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज (बुधवार, १४ फेब्रुवारी) पाचवा दिवस आहे. मनोज जारंगे यांनी १० फेब्रुवारी रोजी आपले आंदोलन पुन्हा सुरू केले होते. दरम्यान, जरांगे यांनी अन्न – पाणी बंद केल्यामुळे गेल्या पाच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु होईन हात – पाय थरथरायला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या दरम्यान मनोज जारंगे यांनाही बोलण्यात खूप अडचण येत असल्याचे दिसून आले.
(हेही वाचा – 70th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव वगळण्यात आले)
मराठा समाजाकडून अनेक ठिकाणी बंदची हाक –
जरांगेच्या (Manoj Jarange) समर्थनार्थ विविध मराठा संघटनांनी जालना, बीड, सोलापूर आणि नाशिक या गावांमध्ये बंद पुकारला आहे. विशेष म्हणजे, उत्तर सोलापूर आणि सोलापूरच्या कोंडी गावात मराठा समुदाय एकवटला आहे. त्यांनी सर्व दुकाने बंद ठेवली आहेत, तर दुधासह अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
जरांगे यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे –
सततच्या उपोषणामुळे जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. गावकरी, मित्र आणि सहकाऱ्यांनी विनवणी करूनही त्यांचं उपोषण सुरूच आहे. तसेच त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे.
(हेही वाचा – Pulwama attack : पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली)
मनोज जरांगे यांच्या मागण्या –
मराठा आरक्षणाशी संबंधित सरकारच्या अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी करणे, त्यानंतर अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेणे, या जरांगेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहेत. याशिवाय राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील सर्व पोलीस खटले मागे घेण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community