Manoj Jarange : सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ; मनोज जरांगेंचे ठाण्यात आरोप

मनोज जरांगे सध्या राज्यभर आरक्षणासाठी प्रचार करत आहेत. जरांगे मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या ठाण्यात दाखल झाले. ठाण्यात (thane) त्यांची रॅली पार पडली.

85
Manoj Jarange : सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ; मनोज जरांगेंचे ठाण्यात आरोप
Manoj Jarange : सरकारला जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ; मनोज जरांगेंचे ठाण्यात आरोप

आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे. (Manoj Jarange) आम्ही शांततेसाठीच प्रयत्न करत आहोत, तरीदेखील तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात. तुम्ही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांना खतपाणी घालता का ? राज्यात जो जातीयवाद निर्माण करतोय, जो समाजांमध्ये तेढ निर्माण करतो त्याला या सरकारचे पाठबळ तर नाही ना ? राज्य सरकारला राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत का ?, असा प्रश्न मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. (Manoj Jarange)

(हेही वाचा – Woman’s Body Found In Suitcase : कुर्ला सुटकेस मर्डर केस- गुन्ह्याची उकल धारावीतून एकाला अटक )

मनोज जरांगे सध्या राज्यभर आरक्षणासाठी प्रचार करत आहेत. जरांगे मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या ठाण्यात दाखल झाले. ठाण्यात (thane) त्यांची रॅली पार पडली. या रॅलीदरम्यान जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून चालू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर टीका केली. तसेच अशा लोकांना सरकारचे पाठबळ आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला. (Manoj Jarange)

… त्यानंतर कोणाचं ऐकणार नाही

शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे. परंतु, आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही कोणाचं ऐकणार नाही. आम्हाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण हवं आहे, असे म्हणत जरांगे यांनी त्यांची बाजू लावून धरली.  (Manoj Jarange)

(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिरात पुजारी पदासाठी 3000 अर्ज, मुलाखतीसाठी 200 जणांची निवड, विचारले “हे” प्रश्न)

आमची भूमिका चुकीची आहे का ?

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडतोय. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असं वाटतंय. आम्ही शांततेचं आव्हान करतोय. हे चुकीचं आहे का?, असे प्रश्न विचारत जरांगे यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असल्याने विशेष महत्त्व

मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यात जरांगे आले असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषण सुरू असताना ठाण्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. दरम्यान, गेल्या उपोषणाच्या वेळी सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

पुढील आठवड्यात कोकणात खासकरून पालघर जिल्ह्यातील वसई आणि बोईसर येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. पालघर जिल्ह्यात बहुतांश भागात कुणबी समाजाची संख्या मोठी असून, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.