मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या बेमुदत उपोषणाचा आज (सोमवार १९ फेब्रुवारी) दहावा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत. सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही, तर येत्या २१ फेब्रुवारीला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
(हेही वाचा – Fire Crackers : नाव्हा शेवामध्ये 11 कोटींचे चिनी फटाके जप्त; ‘या’ कारणामुळे भारतात आहे बंदी)
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली –
दरम्यान मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खराब झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी त्यांची आरोग्य तपासणी केली असता प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – Protective Food : सर्वोच्च अन्नसंरक्षक असलेल्या स्वादिष्ट पाककृती)
मनोज जरांगे पाटील म्हणाले की,
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले (Manoj Jarange) पाहिजे आणि सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सरकार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आरक्षण रद्द झाले तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. आम्ही ओबीसीच आहोत. सगे-सोयरे अंमलबजावणीही करून हवी आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून काम सुरू आहे. कोट्यवधी मराठ्यांच्या हिताचा हा विषय आहे. जर येत्या २० फेब्रुवारीला ते मिळाले नाही, तर २१ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशी ठरवली जाईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community