मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात’ असे म्हणत मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आता मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. जरांगे सोमवार ४ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – Pune Section 144 : पुणे शहरात संपूर्ण महिनाभर कलम १४४ लागू; कारण ..)
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. अशात आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली आहे. (Manoj Jarange)
(हेही वाचा – Salman Khurshid : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची ईडीकडून मालमत्ता जप्त)
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,
“देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला. पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत. मर्यादा संपली की मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत, त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ. समाजाचे म्हणणे आहे की तुम्ही उपोषण करू नका. समाजाच्या विरोधात जाऊन राजकीय अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे सरकारला लक्षात कसे येत नाही. सहा महिने तुम्ही आमचे फुकटचे घालवले, आता आरक्षण गनिमी काव्याने कसे मिळवू ते तुम्हाला दाखवून देऊ, असेही जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community