Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना

बुधवारी पहाटे पार पडलेल्या या सभेचे पुणेकरांनी मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचे स्वागत केले.

241
Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना
Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना

मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांचे पुण्यामध्ये दिमाखात स्वागत करण्यात आले. पुण्यामध्ये बुधवारी त्यांच्या यात्रेसाठी अभूतपूर्व गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. येथे त्यांच्या सभेला ‘न भूतो न भविष्यती’ असा पाठिंबा मिळाला आहे. त्यानंतर यांची पदयात्रा पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे.

बुधवारी पहाटे पार पडलेल्या या सभेचे पुणेकरांनी मनोज जरांगे यांच्या पदयात्रेचे स्वागत केले. पहाटे सकाळी ५ वाजता ही सभा पार पडली. यावेळी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने त्यांच्या पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे.

(हेही वाचा – ICC ODI Team : आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा )

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन… 
पुण्यात मनोज जरांगे पाटील यांचे मध्यरात्री दीडच्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. कडाक्याची थंडी असूनसुद्धा त्याची तमा न बाळगता अवघा मराठा समाज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यातील रस्त्यांकडे डोळे लावून उभा होता. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पहाटे भव्य सभा झाली. भीमा-कोरेगाव परिसरामध्ये विजयस्तंभ परिसरात जरांगे पाटलांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोकं होते. लहानग्यांपासून अबालवृद्धांपर्यंत मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी हजर होता.

५० किलो लसणाच्या चटणीचे वाटप
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जरांगे-पाटील यांच्यासह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी बॅनर लावले होते. पदयात्रेत सहभागी बांधवांना शिरदाळे आणि खडकी ग्रामस्थांनी चटणी-भाकरी भोजनाची व्यवस्था केली होती. ग्रामस्थांकरिता साडेतीन हजार चपात्या, ५० किलो शेंगदाण्याची चटणी, ५० किलो लसणाच्या चटणीचे वाटप मराठा बांधवांना करण्यात आहे. रांजणगाव-कारेगाव परिसरातील सर्व गावांत चपाती आणि शेंगदाणा चटणी करण्यात आली होती.

पुण्यातील पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे
मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो मराठा स्वयंसेवक मदत करत आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही, याची काळजी प्रत्येक स्वयंसेवकाकडून घेतली जात आहे. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य मदत केंद्रे उभारली जाणार आहेत. पुण्यातील पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.